मेलबर्न - ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेमध्ये रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्ह आणि रोमानियाच्या सिमोना हॅलेप यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाची तिसरी फेरी गाठली. आज (गुरूवारी) झालेल्या सामन्यात मेदवेदेव्हने स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझ ७-५, ६-१, ६-३ ने पराभव केला तर हॅलेपने हॅरिएट डार्ट हिला ६-२, ६-४ अशी धूळ चारली.
तिसऱ्या फेरीत दाखल झालेले पुरुष खेळाडू -
- पाब्लो कॅरेनो बुस्टा ( स्पेन )
- निक किरगिओस ( ऑस्ट्रेलिया )
- गील मोनफिल्स ( फ्रान्स )
- नोव्हान जोकोव्हिच ( सार्बिया )
- योशीहितो निशिओका ( जपान )
- दुसान लाजोविच ( सार्बिया )
- डिएगो श्वार्टजमन ( अर्जेटिना )
- रॉजर फेडरर ( स्वित्झरलँड )
- रॉबर्टो बाउटिस्टा अॅगूट ( स्पेन )
- टॉमी पॉल ( अमेरिका )
- स्टीफानोस त्सित्सिपास (ग्रीस )
तिसऱ्या फेरीत दाखल झालेले महिला खेळाडू -
- अश्ले बार्टी ( ऑस्ट्रेलिया )
- अॅलेना रायबाकिना ( कझाकिस्तान )
- नाओमी ओसाका ( जपान )
- कोको गॉफ (अमेरिका)
- सेरेना विल्यम्स ( अमेरिका )
- सेरेना हॅलेप ( रोमानिया )
- करोलिना प्लिस्कोवा (झेक प्रजासस्ताक )
- बेलिंडा बेंसिक (स्वित्झरलँड )
हेही वाचा - Australian Open : सानियाची मिश्रनंतर महिला दुहेरीतूनही माघार, जाणून घ्या कारण...
हेही वाचा - Australian Open : चूक झाली, रागात 'रॅकेट' आदळलं, पण पोहोचली तिसऱ्या फेरीत