ETV Bharat / sports

न्यूझीलंडमध्ये होणारी टेनिस स्पर्धा कोरोनामुळे रद्द - ऑकलंड टेनिस स्पर्धा २०२१

ऑकलंड येथे होणारी एटीपी आणि डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. एटीपी प्रकारात पुरुष गटात फ्रान्सचा युगो हॅमबर्ट गतविजेता आहे. तर, डब्ल्यूटीए महिला विभागात अनुभवी महिला खेळाडू सेरेना विल्यम्सला या स्पर्धेत आपल्या विजेतेपदाचा बचाव करायचा होता.

Auckland classic tennis event has been cancelled due to the coronavirus pandemic
कोरोनामुक्त न्यूझीलंडमध्ये होणारी टेनिस स्पर्धा रद्द
author img

By

Published : Oct 6, 2020, 5:54 PM IST

ऑकलंड - कोरोना विषाणूच्या साथीमुळे पुढील वर्षी जानेवारीत न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे होणारी एटीपी आणि डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. एका वृत्तानुसार, एएसबी क्लासिक स्पर्धेचे संचालक कार्ल बझ यांनी मंगळवारी ही घोषणा केली. ''आयोजकांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ते रद्द करण्यात आले'', असे बझ यांनी सांगितले.

एटीपी प्रकारात पुरुष गटात फ्रान्सचा युगो हॅमबर्ट गतविजेता आहे. तर डब्ल्यूटीए महिला विभागात अनुभवी महिला खेळाडू सेरेना विल्यम्सला या स्पर्धेत आपल्या विजेतेपदाचा बचाव करायचा होता. बझ म्हणाले, "ही बातमी सांगताना आम्हाला वाईट वाटते. पण सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. क्लासिक संघ, स्वयंसेवक आणि आमच्या प्रायोजकांचे मला आभार मानायचे आहे. ज्यांनी या स्पर्धेसाठी अथक प्रयत्न केले."

स्पर्धेच्या नवीन तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. जानेवारीत न्यूझीलंडमध्ये दाखल होणाऱ्या कोणत्याही खेळाडूला दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइन राहावे लागेल. कोरोना विषाणूच्या साथीमुळे न्यूझीलंडच्या सीमा सध्या बंद आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.