ETV Bharat / sports

एटीपीने सेफ्टी पॉलिसीच्या रिव्हूची केली घोषणा - एटीपी

असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) ने सेफ्टी पॉलिसीच्या रिव्हू संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.

ATP announces review of safeguarding policies
एटीपीने सेफ्टी पॉलिसीच्या रिव्हूची केली घोषणा
author img

By

Published : Aug 22, 2021, 4:55 PM IST

Updated : Aug 22, 2021, 5:05 PM IST

ल्यूसाने - असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स (एटीपी) ने सेफ्टी पॉलिसीच्या रिव्हू संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. यात त्यांनी, व्यावसायिक टेनिसमध्ये सहभागी सर्व प्रौढ आणि अल्पवयीनांना गैरवर्तनापासून वाचवण्यासाठीच्या वचनबद्धतेनुसार, सुरक्षा धोरण जाहीर केले आहे. हे धोरण एक स्वतंत्र रिपोर्ट कमिशन द्वारा तयार करण्यात आले आहे. याचे संकलन खास सल्लागाराच्या एका टीमने केले आहे.

एटीपीने याविषयी एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, दुरुपयोग प्रकरणात एटीपी आचारसंहितेनुसार पुढील कारवाई करण्याची आवश्यकता आहे का हे तपासले जात होते. यामुळे या प्रकरणात न्यायालयीन अधिकारींना यावर निर्णय देण्यापासून रोखलं जात असे.

रिपोर्टमध्ये संघटनाची सुरक्षा वाढवणे आणि अधिक सक्रिय भागिदारीच्या संधीची ओळख पटवण्यासाठीच्या अनेक शिफारसी निर्धारित करण्यात आल्या आहेत. एटीपी घरगुती हिंसा संदर्भातील प्रकरणासह अनेक सुरक्षा प्रकरणात आपल्या शिफारसी आणि पुढील वाटचालीचे मुल्यांकन करणार असल्याचे देखील एटीपीने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.

एटीपीचे सीईओ मास्सिमो कालवेल्ली यांनी याविषयी सांगितलं की, दरवर्षी गैरवर्तन प्रकारात लाखों पीडितेवर मोठा आघात होतो. यामुळे आम्हाला वाटतं की, टेनिसमध्ये यावर प्रत्येकाने चिंता व्यक्त करण्याची आणि सुरक्षा, प्रतिनिधित्व तसेच याविरुद्ध आवाज उठवण्याचा विचार केला पाहिजे. अशा प्रकरणाचा परिणाम आमच्या खेळावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांवर देखील होऊ शकतो. यामुळे आम्हाला याची कल्पना आहे की, आमची जबाबदारी मोठी आहे.

हेही वाचा - Tokyo Olympics : नोवाक जोकोव्हिचचा संताप; रागाच्या भरात तोडलं रॅकेट, पाहा व्हिडिओ

हेही वाचा - विम्बल्डनमध्ये एका महिलेवर फोकस झाला कॅमेरा, प्रेक्षकांनी उभे राहून केला टाळ्याचा कडकडाट

Last Updated : Aug 22, 2021, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.