ETV Bharat / sports

इटालियन ओपनपाठोपाठ फ्रेंच ओपन स्पर्धेतूतनही शारापोव्हाची माघार - French Open

शारापोव्हाने २०१२ आणि २०१४ मध्ये फ्रेंच ओपनचा किताब आपल्या नावे केला आहे

Maria Sharapova
author img

By

Published : May 16, 2019, 5:25 PM IST

नवी दिल्ली - रशियाची माजी अग्रमानांकित महिला टेनिस स्टार मारिया शारापोव्हाने खांद्याच्या दुखापतीमुळे इटालियन ओपनपाठोपाठ फ्रेंच ओपन स्पर्धेतूतनही आपले नाव मागे घेतले आहे. स्वत: शारापोव्हाने आपल्या इन्स्टाग्रामरुन आपण स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. २०१८ पासून शारापोव्हा खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे.

मारिया शारापोव्हा
मारिया शारापोव्हा

तीन वेळची ग्रँड स्लॅम विजेती असलेली शारापोव्हा यावर्षी जानेवारीत झालेल्या सेंट पीटर्सबर्ग ओपन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतुन बाहेर पडली होती. यानंतर ती कोणतीच स्पर्धा खेळली नाहीय.

शारापोव्हाने २०१२ आणि २०१४ मध्ये फ्रेंच ओपनचा किताब आपल्या नावे केला आहे. त्यानंतर उत्तेजक पदार्थ (ड्रग) सेवन चाचणीमध्ये ती दोषी आढळल्याने तीच्यावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. २०१७ मध्ये बंदीनंतर शारापोव्हााने टेनिस कोर्टवर पुनरागमन केले होते.

Intro:Body:

sports 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.