आस्ट्रिया - यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत नावारूपास आलेली अमेरिकेच्या कोको गॉफने परत एकदा इतिहास रचला. १५ वर्षाची टेनिसपटू कोको गॉफने लिंज ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यामुळे कोको आता डब्ल्यूटीएफमध्ये (WTA) प्रवेश करणारी दुसरी युवा टेनिसपटू ठरली आहे.
-
It's a first WTA singles final for @CocoGauff! She ousts Petkovic 6-4, 6-4 to reach the championship match at @WTALinz! pic.twitter.com/9Ozg3e3PpM
— WTA (@WTA) October 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">It's a first WTA singles final for @CocoGauff! She ousts Petkovic 6-4, 6-4 to reach the championship match at @WTALinz! pic.twitter.com/9Ozg3e3PpM
— WTA (@WTA) October 12, 2019It's a first WTA singles final for @CocoGauff! She ousts Petkovic 6-4, 6-4 to reach the championship match at @WTALinz! pic.twitter.com/9Ozg3e3PpM
— WTA (@WTA) October 12, 2019
हेही वाचा - भारत-आफ्रिका कसोटीमध्ये तब्बल ११ वर्षांनी घडली 'ही' गोष्ट
१५ वर्षाच्या कोकोने उपांत्य सामन्यात जर्मनीच्या अँड्रिया पेटकोविकला ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. २००४ मध्ये ताश्कंद टायटल विजेती निकोल वाइडिसोवानंतर, कोको या डब्ल्यूटीएफमध्ये प्रवेश करणारी दुसरी युवा टेनिसपटू ठरली आहे. जागतिक क्रमवारीत कोको ११० व्या क्रमांकावर आहे.
टेनिस विश्वातील सर्वात जुनी आणि सर्वात मानाची असलेली विम्बल्डन ओपन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद पाहायला मिळाली होती. कोरी गॉफने ३९ वर्षीय व्हिनस विलियम्सला ६-४, ६-४ असे हरवत टेनिस विश्वात खळबळ उडवून दिली होती. एक खास गोष्ट म्हणजे कोरीचा जन्म झाला होता तेव्हा व्हिनस विलियम्सने ४ ग्रँडस्लॅम जिंकले होते.