टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघात सामना होणार आहे. ग्रुप एकमधील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया त्यांच्या तिसऱ्या सामन्यात मैदानात उतरले आहेत. इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला.
ऑस्ट्रेलियाने 125 धावांचे लक्ष्य इंग्लंड संघासमोर ठेवले
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर केवळ 1 धावा काढून माघारी परतल्यानंतर स्टीव्ह स्मिथ (१), ग्लेन मॅक्सवेल (६), मार्कस स्टॉइनिस (०) झटपट बाद झाले. त्यानंतर मॅथ्यू वेड (१८) आणि अगरन (२०) यांनी धावांसाठी धावाधाव केली. फिंच याने ४ चौकारांसह ४४ धावा केल्या. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने १७ धावांत ३ बळी घेतले. तर वोक्स आणि टायमल मिल्सला प्रत्येकी २ बळी घेतले.
जॉस बटलर ठरला इंग्लंडचा विजयाचा शिल्पकार
ऑस्ट्रेलियाने 125 धावांचे लक्ष्य इंग्लंड संघासमोर ठेवले होते. ही धाव संख्या उभारताना इंग्लंडचा फलंदाजांना फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. सलामीवीर जेसन रॉय आणि जॉस बटलर यांनी दमदार सुरूवात केल्यानंतर रॉय 20 धावा काढून बाद झाला. त्यापाठोपाठ दावीद मालनही 8 धावामध्ये माघारी फिरला. त्यानंतर जॉनी बेर्स्टोच्या साथीने जॉस बटलरने 126 धावांचे लक्ष्य लीलया. जॉस बटलरने 71 धावांची झुंझार खेळी केली आणि इंग्लंडच्या विजयाचा पाया भक्कम केला.
दोन्ही संघांतील खेळाडू
इंग्लंड – इऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, टायमल मिल्स.
ऑस्ट्रेलिया – अॅरॉन फिंच (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एश्टन अगर, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.
हेही वाचा - T20 Wc Pak Vs Afg : पाकिस्तानची विजयी हॅट्ट्रिक.. अफगाणिस्तानवर पाच विकेट्सने विजय