ETV Bharat / sports

विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीप : अमित पांघलने जिंकले ऐतिहासिक 'रौप्य'पदक

सामन्यात अमितने सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमितचे ठोसे योग्य ठिकाणी लागत नव्हते. उलट विरोधी बॉक्सर झोइरोव्हने मात्र अचुक ठोसे लगावले. दुसऱ्या राऊंडमध्ये अमित गडबडलेला दिसला. तेव्हा झोइरोव्हने संधी साधून गुणाची कमाई करत सामना जिंकला.

विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीप : अमित पांघलला 'रौप्य' पदकावर समाधान
author img

By

Published : Sep 21, 2019, 8:40 PM IST

Updated : Sep 21, 2019, 9:36 PM IST

ईकॅटरिनबर्ग - भारताचा पुरुष बॉक्सर अमित पांघलला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अमितला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या एस. झोइरोव्हकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवाबरोबर त्याचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आणि त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

रिओ ऑलिम्पिक २०१६ मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या झोइरोव्हने अमितचा ५-० ने एकतर्फी पराभव केला. दरम्यान, यंदाची विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धा भारताच्या बॉक्सरपटूंसाठी महत्वाची ठरली. या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले. अमितने तर आपल्या कारकिर्दीमधील सर्वश्रेष्ठ कामगिरी करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला.

सामन्यात अमितने सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमितचे ठोसे योग्य ठिकाणी लागत नव्हते. उलट विरोधी बॉक्सर झोइरोव्हने मात्र अचुक ठोसे लगावले. दुसऱ्या राऊंडमध्ये अमित गडबडलेला दिसला. तेव्हा झोइरोव्हने संधी साधून गुणाची कमाई करत सामना जिंकला.

अमितने या स्पर्धेत केलेली कामगिरी पाहून भारतीयांच्या सुवर्णपदकाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, अमितच्या पराभवाने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अमितने २०१८च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. याशिवाय आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्याने २०१७ मध्ये कांस्य आणि २०१९ मध्ये सुवर्णपदक जिंकले.

हेही वाचा - विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप : फायनलमध्ये प्रवेश करणारा अमित पांघल ठरला पहिलाच भारतीय खेळाडू

याआधी विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताकडून विजेंदर सिंह, विकार क्रिशन, शिव थापा, गौरव बिधुरी या खेळाडूंनी कांस्यपदकाची कमाई केली होती. यंदाच्या यंदाच्या स्पर्धेत भारताच्या मनिष कौशलने कांस्यपदकाची कमाई केली आहे. तर अमित पांघलने रौप्य जिंकत ऐतिहासीक कामगिरी केली. मात्र, अद्याप भारताला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली आहे.

हेही वाचा - ढिंग एक्सप्रेस 'ब्रेक' डाऊन, 'या' कारणाने हिमा दास जागतिक स्पर्धेला मुकणार

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
Last Updated : Sep 21, 2019, 9:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.