तैवान - कोरोनाच्या वातावरणात चायना प्रोफेशनल बेसबॉल लीगने (सीपीबीएल) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. रविवारी डुबोन गार्जियंस आणि राकुटेन मंकीज यांच्यात झालेल्या सामन्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने ही स्पर्धा चर्चेचा विषय ठरली आहे.
लॉकडाऊनमध्ये खेळवली जाणारी तैवानस्थित सीपीबीएल ही पहिली लीग आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे हा सामना प्रेक्षंकांशिवाय खेळवण्यात आला होता. मात्र, खेळाडूंनी स्वत: हा नियम मोडला.
-
We have a baseball brawl in the CPBL!! (via @TheSuzieHunter) pic.twitter.com/AXKk2ynC3T
— Quarantine Bros (@BaseballBros) April 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We have a baseball brawl in the CPBL!! (via @TheSuzieHunter) pic.twitter.com/AXKk2ynC3T
— Quarantine Bros (@BaseballBros) April 19, 2020We have a baseball brawl in the CPBL!! (via @TheSuzieHunter) pic.twitter.com/AXKk2ynC3T
— Quarantine Bros (@BaseballBros) April 19, 2020
चौथ्या इनिंग दरम्यान मंकीज संघाचा दुसरा फलंदाज क्यू येन वेनला चेंडू लागला. यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू डायमंड एरियाजवळ येऊन उभे राहिले.