इस्तंबूल - भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिने यासर डोगू इंटरनॅशनल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तिने ५३ किलो वजनी गटात रशियाची प्रतिस्पर्धी एक्तेरिना पोलेशुचूकचा पराभव केला.
पुरुषांच्या फ्रिस्टाईल कुस्ती प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या राहुल आवारेने ६१ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. याच प्रकारात महाराष्ट्राचाच मल्ल उत्कर्ष काळेने कांस्यपदकाची कमाई केली.
६५ किलो वजनी गटात बजरंग पुनियाच्या अनुपस्थितीत महाराष्ट्रीयन सोनबा तानाजी गोंगाणे याला भारतीय संघात संधी देण्यात आली. मात्र त्याला कांस्यपदकाच्या लढाईत तुर्कीच्या खेळाडूकडून पराभवाचा सामना करावा लागला.