नूर सुल्तान (कझाकिस्तान) - भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगटला (50 किलो) विश्व कुस्ती चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत पराभवचा धक्का बसला. या पराभवाबरोबर विनेशचे विश्व चॅम्पियन बनण्याचे स्वप्न भंगले. मात्र, ती आता रेपचेजच्या माध्यमातून कांस्य पदकासाठी लढणार आहे. विनेश सोबत भारताची सीमा बिस्ला (50 किलो) ही रेपचेजच्या माध्यमातून कांस्यपदकासाठी मैदानात उतरणार आहे.
हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : विनेश फोगटचा पराभव, 'कांस्य'साठी आशा कायम
दुसऱ्या फेरीत विनेशचा जपानची मायु मुकाइदाने पराभव केला. तर सीमाला उपउपांत्य सामन्यात आझरबैजानची खेळाडू मारिया स्टँडनिक हिने 9-2 पराभव केला होता. आता विनेशसह सीमा रेपचेजच्या माध्यामातून दुसरी संधी मिळाली आहे. विनेश आणि सीमाला रेपचेजच्या माध्यमातून पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेता येईल.
हेही वाचा - विश्व कुस्ती चॅम्पियनशीप : विनेश फोगटचा विजयारंभ, सलामीलाच ऑलिम्पिक विजेतीवर केली मात
विनेशला रेपचेजच्या माध्यमातून तीन सामने खेळावे लागणार आहेत. यात तीला युक्रेनची यूलिया खावदजी ब्लाहनिया, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली हिल्डरब्रँड आणि युनानच्या मारिया प्रेवोलाराकी यांच्याशी दोन हात करावे लागणार आहे. विनेशने हिल्डरब्रँड विरुध्दचा दुसरा रेपचेजचा सामना जिंकल्यास ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल.
सीमाला रेपचेजच्या पहिल्या फेरीत नायजेरियाच्या मॅसीनेई मर्सी जेनेसिस यांच्याशी होणार आहे. यानंतर ती दुसरा सामना रशियाच्या एकोतेरिन पोलेशचुक हिच्याशी खेळणार आहे. सीमाने जर हा सामना जिंकला तर ती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल. रेपचेजच्या सामन्यांना उद्या (बुधवार) पासून सुरूवात होणार आहे.