नवी दिल्ली - हंगेरीयन ग्रँड प्रिक्सच्या तिसर्या सराव सत्रात मर्सिडीज संघाचा चालक वाल्टेरी बोटासने अव्वल स्थान राखले. तर, लुईस हॅमिल्टनला दुसरे स्थान मिळाले. मर्सिडीजचे दोन्ही ड्रायव्हर हंगामातील पहिल्या दोन शर्यतीचे विजेते आहेत. बोटासने ऑस्ट्रियन ग्रँड प्रिक्स तर हॅमिल्टनने स्टायरियन ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद पटकावले आहे.
बोटासने या सराव सत्रात गत सत्रातील चॅम्पियन व सहकारी हॅमिल्टनपेक्षा 0.042 सेकंदाचा कमी वेळ घेतला. रेसिंग पॉईंट संघाचा सर्जिओ पेरेझ तिसरा आणि फरारीचा चार्ल्स लेक्लार्क चौथा आणि रेसिंग पॉईंटचा लान्स स्ट्रॉल पाचव्या स्थानावर राहिला.
रेड बुलच्या टीमला पुन्हा एकदा संघर्ष करावा लागला. त्यांचा ड्रायव्हर मॅक्स वसेर्टेपनला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याचा संघाचा सहकारी अॅलेक्स अल्बानला 12 वे स्थान मिळाले.
ऑस्ट्रिया फॉर्म्युला वन शर्यतीचे विजेतेपद बोटासकडे -
फिनलँडच्या वाल्टेरी बोटासने नुकतेच ऑस्ट्रिया फॉर्म्युला वन शर्यतीचे विजेतेपद पटकावले आहे. बोटासने दिमाखदार पद्धतीने मर्सिडिजसाठी फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत जिंकली. तर, पाच सेकंदाच्या 'टाईम पेनल्टी'मुळे या स्पर्धेत विश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.