ETV Bharat / sports

खेलो इंडियामध्ये रोलबॉलचा समावेश करण्यासाठी सहकार्य करू - केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे आश्वासन

खेलो इंडियाच्या ( Khelo India Games ) पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेत रोलबॉलचा समावेश करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर ( Union Sports Minister Anurag Thakur ) यांनी दिले आहे. तसेच अनुराग ठाकूर यांनी सर्व माहिती घेतली व योग्य सहकार्याचे आश्वासन दिले.

अनुराग ठाकूर
Anurag Thakur
author img

By

Published : May 5, 2022, 7:27 PM IST

पुणे: खेलो इंडियाच्या पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेत रोलबॉलचा समावेश करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर ( Union Sports Minister Anurag Thakur ) यांनी दिले आहे. आज सकाळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची पुण्यात प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, पुणे जिल्ह्याचे सचिव श्री. प्रमोद काळे,ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे उपस्थित होते.

यावेळी त्यांना पुण्यामध्ये 19 ते 22 मे दरम्यान बालेवाडी येथे होणाऱ्या अठराव्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आमंत्रण ( Invitation to 18th National Rollball Tournament ) देण्यात आले. तसेच या खेळाचा समावेश खेलो इंडिया गेम्समध्ये व्हावा. त्याचबरोबर राष्ट्रीय स्पर्धेला दूरदर्शनच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळावी आणि राष्ट्रीय स्पर्धेला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचे सहकार्य मिळावे, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्व माहिती घेतली व योग्य सहकार्याचे आश्वासन दिले.

या अगोदर खेलो इंडियामध्ये 5 नवीन खेळांचा समवेश - यावेळी खेलो इंडिया युथ गेम्समध्ये 5 नवीन खेळांचा समावेश ( Includes 5 new games ) करण्यात आला आहे. पंजाबचा गतका, मणिपूरचा थांगटा, केरळचा क्लारीपैटू, महाराष्ट्राचा मलखम यांचा समावेश आहे. याशिवाय यावेळी योगासनालाही स्थान देण्यात आले आहे. काही खेळ पंचकुलामध्ये तर काही बाहेर होणार आहेत. पंजाब युनिव्हर्सिटी स्टेडियम आणि ताऊ देवीलाल स्टेडियमवरही फुटबॉलचे सामने होणार आहेत. पाच नवे खेळ जोडले गेले आहेत, ते पंचकुलाच्या क्रिकेट स्टेडियममध्ये असतील. वेट लिफ्टिंगचा कार्यक्रम पंचकुलाच्या सेक्टर 14 येथील गर्ल्स कॉलेजमध्ये होणार आहे. जिमखाना क्लब सेक्टर 6 पंचकुला येथे टेनिस खेळ होणार आहे. ज्युदोचा कार्यक्रम रेड बिशप हॉटेलमध्ये होणार आहे. तिरंदाजीचा खेळ पंजाब विद्यापीठाच्या मैदानावर होणार आहे.

हेही वाचा - Icc T20 World Cup 2022 : टी 20 विश्वचषक सुरु होण्यापूर्वी भारतीय संघासमोर 'या' फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.