लंडन - यंदाचा ब्रिटनचा सायकलिंग दौरा रद्द करण्यात आला आहे. आयोजकांनी याबाबत गुरुवारी माहिती दिली. हा दौरा 6 ते 13 सप्टेंबर दरम्यान होणार होता. "कोरोनामुळे उद्भवलेल्या सद्य परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या शर्यतीचे नियोजन आणि आयोजन करणे कठीण झाले आहे", असे आयोजकांनी सांगितले.
ब्रिटिश सरकारने 1 जूनपर्यंत कोणतीही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास बंदी घातली आहे. सप्टेंबरपूर्वी कोणत्याही मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन होणार नाही, असा विश्वास या स्पर्धेच्या आयोजकांनी व्यक्त केला. ते म्हणाले, "प्रेक्षकांची उपस्थिती नसलेला ब्रिटन दौरा आयोजित करणे वास्तविकतेपेक्षा पलीकडे आहे."
या शर्यतीच्या मागील हंगामात 15 लाख दर्शक उपस्थित होते.