नवी दिल्ली - इजिप्तमध्ये सुरू असलेल्या विश्व ज्यूनियर आणि कॅडेट तलवारबाजी चॅम्पियनशीमध्ये भाग घेतलेल्या दोन भारतीय तलवारबाजांना कोरोनाची लागण झाली आहे. तलवारबाज असोसिएशन ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकारांने या वृत्ताला पृष्टी दिली.
एफएआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, 'विश्व ज्यूनियर आणि कॅडेट तलवारबाजी स्पर्धेत सहभागी झालेल्या दोन खेळाडूंना कोरानाची लागण झाली आहे. त्यांची पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. यात जर ते पॉझिटिव्ह आढळले तर त्यांना १५ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे.'
दरम्यान, ९ दिवसीय विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या २४ तलवारबाजांनी सहभाग नोंदवला आहे. यात १२ महिला तलवारबाज आहेत. एफएआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, या स्पर्धेत अद्याप कोणत्याही भारतीय खेळाडूला पदक जिंकता आलेले नाही. भारतीय तलवारबाजांनी साब्रे, फॉयल आणि एपी या तिन्ही प्रकारात भाग घेतलं आहे.
हेही वाचा - नेत्रा कुमानन बनली ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय नौकायनपटू
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोविडची लक्षणे असणाऱ्या खेळाडूंना वेगळ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार