ETV Bharat / sports

Tokyo Paralympic : भारताने जिंकलेले पदक गमावलं, विनोद कुमारचे कास्य पदक काढून घेतलं - अवनी लेखरा

भारतीय थाळीफेकपटू विनोद कुमार याने F52 गटात कास्य पदक जिंकले. यानंतर विनोद कुमार हा या कॅटीगरीसाठीच्या नियमात बसत नसल्याचे सांगत प्रतिस्पर्धी खेळाडूंनी यावर आपेक्ष नोंदवला. तेव्हा तपासाअंती त्यांच्याकडून कास्य पदक काढून घेण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतला.

tokyo-paralympics-indian-discus-thrower-vinod-kumar-lost-his-medal-after-the-classification-panel-was-unable-to-allocate-with-a-sport-class?
Tokyo Paralympic : भारताने जिंकलेले पदक गमावलं, विनोद कुमारचे कास्य पदक काढून घेतलं
author img

By

Published : Aug 30, 2021, 4:17 PM IST

Updated : Aug 30, 2021, 5:14 PM IST

टोकियो - टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंने जिंकलेले पदक काढून घेण्यात आले आहे. यामुळे भारताचे एक पदक कमी झाले आहे.

भारतीय थाळीफेकपटू विनोद कुमार याने F52 गटात कास्य पदक जिंकले. यानंतर विनोद कुमार हा या कॅटीगरीसाठीच्या नियमात बसत नसल्याचे सांगत प्रतिस्पर्धी खेळाडूंनी आक्षेप नोंदवला. तेव्हा तपासाअंती त्यांच्याकडून कास्य पदक काढून घेण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतला.

नेमके काय आहे प्रकरण -

विनोद कुमारने रविवारी 19.91 मीटर लांब थाली फेकली आणि तो कास्य पदकाचा मानकरी ठरला. तेव्हा प्रतिस्पर्धी खेळाडूंनी विनोद कुमार F52 गटाच्या कॅटिगरीसाठीच्या नियमात बसत नसल्याचे सांगत आक्षेप नोंदवला. तेव्हा आयोजन समितीने विनोद कुमारचे पदक होल्डवर ठेवण्याचा निर्णय घेतला. तपासात विनोद कुमार या कॅटिगरीसाठी पात्र ठरला नाही. तेव्हा आयोजन समितीने त्याचे पदक काढून घेतले.

भारताचे मिशन प्रमुख गुरशरण सिंह यांनी याविषयी सांगितलं की, तपासाअंती विनोद कुमार क्लालिफिकेशनच्या कॅटिगरीत बसला नाही. यामुळे आयोजन समितीने त्याचे पदक काढून घेतले आहे.

दरम्यान, या प्रकारात पोलंडच्या पियोट्र कोसेविजने सुवर्ण पदक जिंकले होते. तर क्रोएशियाच्या वेलिमीर सॅडोरने रौप्यपदकचा मानकरी ठरला होता.

टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भारतीय अॅथलिटची दमदार कामगिरी -

टोकियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सोमवारचा दिवस गाजवला. आज भारतीय खेळाडूंनी चार पदकांची कमाई केली. नेमबाज अवनी लेखरा हिने सुवर्णपदकाची कमाई करून इतिहास रचला. तर गोळाफेकमध्ये योगेश काथूनिया व भालाफेकीत देवेंद्र झाझरिया यांनी रौप्यपदक जिंकले. यानंतर भालाफेकीत सुंदर सिंग गुर्जरने कास्य पदकाला गवसणी घातली.

हेही वाचा - Tokyo Paralympics : सुवर्ण पदक जिंकल्यानंतर अवनी लेखराची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

हेही वाचा - Exclusive: पॅरा अॅथलिट पहिल्यापासूनच रिअल हिरो आहेत, सुवर्णपदक विजेत्या अवनीच्या वडिलांची प्रतिक्रिया

Last Updated : Aug 30, 2021, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.