ETV Bharat / sports

Tokyo Paralympics : भारताला धक्का, स्विमर सुयश जाधव ठरला अपात्र, जाणून घ्या कारण - पॅरा स्विमर सुयश जाधव

भारतीय पॅरा स्विमर सुयश जाधवला टोकियो पॅराऑलिम्पिकच्या 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक एसबी7 च्या अंतिम सामन्यात, नियमांचे उल्लंघन केल्याने अपात्र ठरवण्यात आले आहे.

tokyo-paralympics-2020-swimmer-suyash-jadhav-disqualified-for-rule-violation
Tokyo Paralympics : भारताला धक्का, स्विमर सुयश जाधव ठरला अपात्र, जाणून घ्या कारण
author img

By

Published : Sep 1, 2021, 5:28 PM IST

टोकियो - भारतीय पॅरा स्विमर सुयश जाधवने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये निराश केले. तो 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक एसबी7 च्या अंतिम सामन्यात, नियमांचे उल्लंघन केल्याने अपात्र ठरला. यासह त्याचे पदकाचे स्वप्न भंगले आहे.

आशियाई पॅरा खेळ 2018 मध्ये एक सुवर्ण आणि दोन कास्य पदक जिंकणारा सुयश जाधवला विश्व पॅरा स्विमर नियम 11.4.1 चा भंग केल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले. या नियमानुसार, स्पर्धेच्या सुरूवातीला पहिल्या ब्रेस्ट स्ट्रोक किकच्या आधी आणि प्रत्येक लॅफवर फिरण्याआधी फक्त एक बटरफ्लाय किकची परवानगी असते. पण 27 वर्षीय सुयश जाधवने लॅपवर फिरण्यानंतर एकापेक्षा जास्त फ्लाय किक मारली. यामुळे त्याला अपात्र ठरवण्यात आले आहे.

पुरूष 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक एसबी 7 स्पर्धेत कोलंबियाच्या सेरानो जराटे सिडी याने सुवर्ण पदक जिंकले. त्याने 1 मिनिट 12.01 सेंकदात ही शर्यत पूर्ण केली. रूस पॅराऑलिम्पिक समितीचा इगोल इफ्रोसिनाना 1 मिनिट 16.43 सेंकदासह रौप्य पदकाचा मानकरी ठरला. तर ऑस्ट्रेलियाच्या ब्लेक कोचरेन याने 1 मिनिट 16.97 सेंकदाचा वेळ घेत कास्य पदक जिंकले.

दरम्यान, 11 वर्षाचा असताना सुयश जाधव विजेता शॉक लागला. या अपघातात त्याचे दोन्ही हात कापावे लागले होते.

हेही वाचा - Tokyo Paralympics: भगत-पलक मिश्र दुहेरी जोडीचा पहिल्या सामन्यात पराभव

हेही वाचा - IND vs ENG : भारतीय संघाने चौथ्या कसोटीसाठी राखीव गोलंदाजाचा संघात केला समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.