टोकियो - ज्या मिशनसह मीराबाई चानू टोकियोला पोहोचली होती. ते मिशन दुसऱ्याच दिवशी पूर्ण झालं. यामुळे मीराबाई चानू चौथ्या दिवशीचं भारताकडे निघाली आहे. 26 वर्षीय मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलोग्राम वजनी गटात भारताला रौप्य पदक जिंकून दिलं आहे.
भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने घर वापसीची माहिती दिली. तिने या संदर्भात ट्विट केल असून यात तिने, आपल्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय आठवणींसह घरी परतत आहे, असे म्हटलं आहे. यासोबत मीराबाई चानूने, सर्वांचे आभार देखील मानले आहेत.
-
Heading back to home 🇮🇳, Thank you #Tokyo2020 for memorable moments of my life. pic.twitter.com/6H2VpAxU1x
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) July 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Heading back to home 🇮🇳, Thank you #Tokyo2020 for memorable moments of my life. pic.twitter.com/6H2VpAxU1x
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) July 26, 2021Heading back to home 🇮🇳, Thank you #Tokyo2020 for memorable moments of my life. pic.twitter.com/6H2VpAxU1x
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) July 26, 2021
202 किलो वजन उचलत जिंकलं रौप्य पदक -
मीराबाई चानूने महिला 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत रौप्य पदकाला गवसणी घातली. तिने स्नॅच राउंडमध्ये 87 तर क्लीन अॅण्ड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलले. चीनची वेटलिफ्टरने या प्रकारात 210 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले. तर इंडोनेशियाची वेटलिफ्टर 194 किलो वजनासह तिसऱ्या क्रमाकावर राहिली. तिला कांस्य पदक मिळाले.
वेटलिंफ्टिमध्ये पदक जिंकणारी मीराबाई चानू दुसरी भारतीय
ऑलिम्पिकमध्ये वेटलिंफ्टिगमध्ये पदक जिंकणारी मीराबाई चानू दुसरी भारतीय ठरली. याआधी 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्नम मल्लेश्वरीने 69 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले होते. या प्रकारात मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकत भारताचा 21 वर्षांचा दुष्काळ संपवला.
हेही वाचा - IND Vs SL : हार्दिक पांड्याने गायलं श्रीलंकेचं राष्ट्रगीत, व्हिडिओ व्हायरल
हेही वाचा - Tokyo Olympics : मानल राव! 13 वर्षीय मुलीने ऑलिम्पिकमध्ये जिंकलं सुवर्ण पदक