ETV Bharat / sports

वेटलिफ्टर हबबार्ड ठरणार ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू - Olympics transgender athlete news

वेटलिफ्टर लॉरेल हबबार्ड ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार आहे. ती ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू ठरणार आहे. महिलांच्या ८७ किलोपेक्षा अधिक वजनी गटात हबबार्ड सहभाग घेणार आहे.

Tokyo Olympics: NZ weightlifter Hubbard to become first transgender athlete at Games
वेटलिफ्टर हबबार्ड ठरणार ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू
author img

By

Published : Jun 21, 2021, 10:43 PM IST

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकला २३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. यात वेटलिफ्टर लॉरेल हबबार्ड सहभाग घेणार आहे. ती ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू ठरणार आहे. महिलांच्या ८७ किलोपेक्षा अधिक वजनी गटात हबबार्ड सहभाग घेणार आहे. न्यूझीलंड ऑलिम्पिक समितीने आज याची माहिती दिली.

ट्रान्सजेंडर खेळाडूला महिला म्हणून स्पर्धा करण्यास परवानगी देणारी मार्गदर्शक तत्त्वे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने जारी केलेली होती. त्यामुळे २०१५ पासून हबबार्ड ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास पात्र ठरली आहे. हबबार्डने २०१७ च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक आणि सामोआ येथील २०१९च्या पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तिने २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतला होता. परंतु तिला या स्पर्धेत दुखापत झाली होती.

दरम्यान, हबबार्डने न्यूझीलंडच्या लोकांनी पाठिंबा दिल्याने त्यांचे आभार मानले आहेत. हबबार्डने यापूर्वी २०१३ मध्ये पुरुषांच्या वेटलिफ्टिंग इव्हेंटमध्ये भाग घेतला होता. पण तिला यात पदक जिंकता आलं नव्हतं.

हेही वाचा - Tokyo Olympics साठी १० हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी

हेही वाचा - मिल्खा सिंह यांचा पत्नी निर्मलसह अंतिम प्रवास; पाहा प्रेमाचे भावनिक बंध जपणारा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.