टोकियो - ऑस्ट्रेलियाची महिला जलतरणपटू इम्मा मॅकेन हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदकं जिंकली. यासह ती जलतरणमध्ये एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदक जिंकणारी जगातील पहिली महिला जलतरणपटू ठरली.
ऑस्ट्रेलियाची महिली जलतरणपटू इम्मा मॅकेन ही 27 वर्षांची आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा धडाका लावला. इम्माने आतापर्यंत तब्बल 7 पदकं जिंकली आहेत. यात 4 सुवर्ण तर 3 कांस्य पदकांचा समावेश आहे.
इम्माने या प्रकारात जिंकली पदकं -
इम्माने टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रथम महिला 100 मीटर फ्री स्टाईल प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर तिने महिला 4x100 मीटर फ्री स्टाइल रिले, महिला 4x100 मीटर मेडले रिले आणि महिला 50 मीटर फ्री स्टाइल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. याशिवाय तिने महिला 100 मीटर बटर फ्लाय व महिला 4x200-मीटर फ्री स्टाइल रिले आणि मिश्र 4x100-मीटर मेडले रिलेमध्ये कांस्य पदक जिंकलं आहे.
भारताच्या खात्यात एक पदक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात एक पदक आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये एकूण 202 किलो वजन उचलत भारताला रौप्य पदक जिंकून दिलं आहे. यानंतर भारतीय बॉक्सर लवलिना बार्गोहेन हिने उपांत्य फेरी गाठत आणखी एक पदक निश्चित केलं आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास; ऑलिम्पिकमध्ये प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत
हेही वाचा - Tokyo Olympics : 7 टाके पडलेले असताना देखील लढला पण हरला, बॉक्सर सतीश कुमारचा पराभव