ETV Bharat / sports

Tokyo Olympic : शाब्बाश पोरी! लवलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीत; भारताचे पदक पक्के - Tokyo Olympic

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आठव्या दिवशी भारताचे आणखी एक पदक निश्चित झालं आहे. भारताची स्टार महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीत पोहोचली आहे.

Tokyo Olympic : शाबाश पोरी! लवलिना उपांत्य फेरीत, भारताचे पदक पक्के
Tokyo Olympic : शाब्बाश पोरी! लवलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीत; भारताचे पदक पक्के
author img

By

Published : Jul 30, 2021, 9:27 AM IST

Updated : Jul 30, 2021, 9:52 AM IST

टोकियो - टोकियो ऑलिम्पिकमध्ये आठव्या दिवशी भारताचे आणखी एक पदक निश्चित झालं आहे. भारताची स्टार महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीत पोहोचली आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत चीनी तैपईच्या चिन चेन नियान हिचा 4-1 ने पराभव केला.

लवलिना 69 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी नोंदवली. लवलिनाचा पहिला सामना जर्मनीच्या नाडिना अप्टेज हिच्याशी झाला. तिने हा सामना 3-2 ने जिंकला. यात पाच पंचानी तिला अनुक्रमे 28, 29, 30, 30, 27 गुण दिले. दुसरीकडे नाडिनाला 29, 28, 27, 27, 30 गुण मिळाले.

उपांत्य फेरीत लवलिनाची गाठ चीन तैपईच्या चिन चेन नियान हिच्याशी झाला. चीन चेन माजी माजी जगज्जेती आहे. पण लवलिनाने या सामन्यात चीनच्या खेळाडूला जोरदार पंच मारले आणि सामना 4-1 असा एकतर्फा जिंकला. लवलिनाची उपांत्य फेरीत गाठ 2019 च्या विश्वविजेत्या टर्कीच्या अ‍ॅना लिसेन्को हिच्याशी होईल.

लवलिना पदक जिंकणारी भारताची दुसरी महिला बॉक्सर -

लवलिना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी भारताची दुसरी भारतीय महिला बॉक्सर बनली. लवलिनाच्या आधी मेरी कोमने कांस्य पदक जिंकले आहे. मेरीने लंडन ऑलिम्पिकमध्ये 2012 मध्ये ही कामगिरी केली होती. बॉक्सिंगमध्ये पुरुष आणि महिला दोघांमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लवलिना तिसरी भारतीय आहे. पुरुषांमध्ये विजेंदर सिंगने 2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

कोण आहे लवलिना बोर्गोहेन

लवलिना बोर्गोहेन 24 वर्षीय भारतीय बॉक्सर आहे. तिचा जन्म आसामच्या सरुपथर विधानसभेतील बरोमुखिया गावात झाला. बरोमुखिया गावची लोकसंख्या 2 हजार इतकी आहे. अशा लहान गावातून पुढे येत लवलिना टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. लवलिनाने याआधी दोन वेळा विश्व चॅम्पियनशीपमध्ये पदक जिंकलं आहे.

हेही वाचा - Tokyo Olympics : चीनने ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेचे वर्चस्व संपवलं; विश्वविक्रम नोंदवत जिंकलं सुवर्णपदक

हेही वाचा - Tokyo Olympics : भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Last Updated : Jul 30, 2021, 9:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.