फ्लोरिडा - दिग्गज गोल्फर टायगर वुड्स आणि फिल मॅकलसन यांनी कोरोना लढ्यात आपले अमूल्य योगदान दिले. या दोन खेळाडूंनी टॉम ब्रॅडी आणि पियोट मॅनिंग यांच्यासह चॅरिटी गोल्फ स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेतून त्यांनी 2 कोटी डॉलर्स जमा केले आहेत.
एका वृत्तानुसार, दक्षिण फ्लोरिडामध्ये वुड्स आणि मॅनिंगने दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले. या दोघांनी विजयापर्यंत आघाडी ठेवली. वुड्स म्हणाला, "मी टॉम आणि पियोट यांना सलाम करतो. ही आमची लढाई आहे आणि आम्ही जगण्याकरता ती लढतो. टॉम आणि पियोट जे करतात ते मी मैदानात जाऊन करू शकत नाही .''
-
Add this golf high five to the canon. pic.twitter.com/7pzcqQbxdb
— Kyle Porter (@KylePorterCBS) May 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Add this golf high five to the canon. pic.twitter.com/7pzcqQbxdb
— Kyle Porter (@KylePorterCBS) May 24, 2020Add this golf high five to the canon. pic.twitter.com/7pzcqQbxdb
— Kyle Porter (@KylePorterCBS) May 24, 2020
कोरोनाव्हायरसमुळे गोल्फ स्पर्धा 12 मार्च पासून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 3 लाख 46 हजार 688 कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत.
तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 54 लाख 98 हजार 580 कोरोनाबाधित आढळले असून 3 लाख 46 हजार 688 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 23 लाख 2 हजार 27 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.