नवी दिल्ली - क्रीडा मंत्रालयाने देशभरातील जिल्हास्तरावर 1000 खेलो इंडिया सेंटर्स (केआयसी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही केंद्रे माजी चॅम्पियन्सच्या देखरेखीखाली चालवली जातील किंवा हे खेळाडू या केंद्रात प्रशिक्षक असतील. या खेळाडूंसाठी शॉर्टलिस्टिंग यंत्रणा तयार केली गेली आहे, जी स्वत: च्या अकादमीची स्थापना करण्यास पात्र असतील किंवा केआयसीमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतील.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंच्या नावांचा प्रथम विचार केला जाईल. नंतर एनएसएफतर्फे आयोजित वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिप किंवा खेलो इंडिया गेम्समध्ये पदक जिंकणारे खेळाडू असतील.
तिसर्या प्रकारात अखिल भारतीय युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पदक जिंकणारे खेळाडू असतील. तर, राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणारे खेळाडू चौथ्या प्रकारात ओळखले जातील.
जम्मू-काश्मीर, अंदमान निकोबार आणि लडाख या विभागात यी केंद्राना आराम देण्यात आला आहे. या ठिकाणांहून एनआयएस प्रमाणपत्र असलेले प्रशिक्षकदेखील अर्ज करण्यास सक्षम असतील.
क्रीडामंत्री किरण रिजिजू म्हणाले, "हा निर्णय त्या दिशेने एक पाऊल आहे. राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा व आर्थिक स्थिरता आहे याची खात्री करुन घ्यायची आहे."