चेन्नई : भारतीय संघाने मलेशियाच्या संघावर शनिवारी चेन्नईत झालेल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी भारतीय हॉकी संघाला विजयी ट्रॉफी प्रदान केली. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयानिधी स्टॅलिन यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री एस के स्टॅलिन यांनी भारतीय हॉकी संघाला एक कोटी 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली.
-
Congratulations to #TeamIndia on clinching their 4th #AsianChampionsTrophy title with a fighting comeback!
— M.K.Stalin (@mkstalin) August 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A remarkable feat that showcases their dedication and prowess.#Chennai, known for its sports-loving spirit, has been a splendid host. Grateful to Hon'ble @ianuragthakur… pic.twitter.com/fel9aqLIAt
">Congratulations to #TeamIndia on clinching their 4th #AsianChampionsTrophy title with a fighting comeback!
— M.K.Stalin (@mkstalin) August 12, 2023
A remarkable feat that showcases their dedication and prowess.#Chennai, known for its sports-loving spirit, has been a splendid host. Grateful to Hon'ble @ianuragthakur… pic.twitter.com/fel9aqLIAtCongratulations to #TeamIndia on clinching their 4th #AsianChampionsTrophy title with a fighting comeback!
— M.K.Stalin (@mkstalin) August 12, 2023
A remarkable feat that showcases their dedication and prowess.#Chennai, known for its sports-loving spirit, has been a splendid host. Grateful to Hon'ble @ianuragthakur… pic.twitter.com/fel9aqLIAt
भारतीय संघाने तब्बल चार वेळा जिंकली ट्रॉफी : चेन्नई येथील महापौर राधाकृष्णन मैदानात एशियन हॉकी चॅम्पीयनशिप ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय हॉकी संघाने जोरदार प्रदर्शन करत मलेशियाच्या संघावर 4-3 ने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यानंतर देशभरात भारतीय संघाचे कौतुक होत आहे. एशियन चॅम्पीयनशिप ट्रॉफीवर भारतीय संघाने तब्बल चार वेळा नाव कोरले आहे.
मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक खेळाडूला दिले पाच लाख : एशियन चॅम्पीयनशिप ट्रॉफी भारतीय संघाने जिंकल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला. ही ट्रॉफी भारतीय संघाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी भारतीय हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली. तर संघाच्या प्रशिक्षकांना प्रत्येकी 2.5 लाख रुपये देण्याची येणार असल्याची घोषणाही एम के स्टॅलिन यांनी केली.
- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लावली मैदानात रोपे : भारत आणि मलेशिया संघाच्या दरम्यान खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दोन्ही संघाच्या सामन्यापूर्वी मैदानात अनुराग ठाकूर यांच्या हस्ते रोपे लावण्यात आली. प्रतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय खेळाडूंना ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या.
हेही वाचा -
- Asian Champions Trophy : भारताने मलेशियाला ४-३ ने चारली धूळ; विक्रमी चौथ्यांदा विजेतेपदावर कब्जा
- ज्यूनियर हॉकी विश्व कप स्पर्धेचे यजमानपद भूषवणार ओडिशा, CM नवीन पटनायक यांची घोषणा
- Indian Hockey Coach Reid : भारतीय संघ हॉकी विश्वचषकाचा प्रमुख दावेदार, संघाचे प्रशिक्षक रीड यांनी मुलाखतीत केला विश्वास व्यक्त