ETV Bharat / sports

जागतिक नेमबाजी स्पर्धा: भारताच्या महिला पिस्तूल संघाने २५ मीटर प्रकार जिंकले सुवर्ण

भारतीय नेमबाजी महिला संघाने जागतिक नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.

shooting-world-cup-india-win-gold-in-womens-25m-pistol-team-event
जागतिक नेमबाजी स्पर्धा: भारताच्या महिला पिस्तूल संघाने २५ मीटर प्रकार जिंकले सुवर्ण
author img

By

Published : Mar 25, 2021, 6:47 PM IST

नवी दिल्ली - भारतीय नेमबाजी महिला संघाने जागतिक नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या संघात चिंकी यादव, मनू भाकेर आणि महाराष्ट्रीयन राही सरनोबत आहे.

भारतीय तिकडीने अंतिम सामन्यात पोलंडच्या इनोवा वावरजोनोवस्का, युलिता बोरेक आणि एग्निस्का कोरेज्वो यांचा सहज पराभव केला. भारतीय संघाने अंतिम सामन्यात १७ गुण मिळवले. तर पोलंडला केवळ ७ गुण घेता आले.

दरम्यान, एकदिवसाआधी चिंकी यादव, मनू भाकेर आणि राही सरनोबत यांनी या स्पर्धेत वैयक्तिक तीन पदकं जिंकली आहेत. या विजयासह भारताचे पदकतालिकेतील स्थिती अधिक मजबूत झाली आहे. भारताच्या नावे या स्पर्धेत आतापर्यंत १० सुवर्ण, सहा रौप्य आणि ५ कांस्य पदक असे मिळून एकूण २१ पदकं आहेत.

अंजूम मोदगिल, श्रेया सक्सेना, गायित्री नित्यानादम यांचा समावेश असलेल्या भारताच्या महिला संघाने ५० मीटर रायफल थ्री प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे.

हेही वाचा - कोल्हापूरच्या लेकीचा दिल्लीत डंका, नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत पटकावले रौप्य पदक

हेही वाचा - चांगला खेळाडू घडवायला दूरदृष्टी असणारा प्रशिक्षक लागतो, दुर्दैवाने प्रशिक्षकांची संख्या घटली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.