चांगवॉन: आयएसएसएफ विश्वचषक 2022 स्पर्धेत सोमवारी भारताचे सुवर्ण पदकाचे खाते उघडले आहे. भारताचा युवा नेमबाज अर्जुन बाबुता याने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून ( Shooter Arjun Babuta won gold medal ) दिले. सुवर्णपदकाच्या लढतीत अर्जुनने टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या लुकास कोझेन्स्कीचा 17-9 असा पराभव केला.
पंजाबचा 23 वर्षीय अर्जुन 2016 पासून भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. यापूर्वी त्याने 661.1 गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थानी असताना सुवर्णपदकाच्या लढतीत स्थान मिळवले होते.
-
Many congratulations to @arjunbabuta on winning the Gold 🥇in 10m Air Rifle Men at @ISSF_Shooting 2022 World Cup, Changwon 👏👏 https://t.co/W0EgX14Eiq pic.twitter.com/JnLvXgFJdV
— SAI Media (@Media_SAI) July 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Many congratulations to @arjunbabuta on winning the Gold 🥇in 10m Air Rifle Men at @ISSF_Shooting 2022 World Cup, Changwon 👏👏 https://t.co/W0EgX14Eiq pic.twitter.com/JnLvXgFJdV
— SAI Media (@Media_SAI) July 11, 2022Many congratulations to @arjunbabuta on winning the Gold 🥇in 10m Air Rifle Men at @ISSF_Shooting 2022 World Cup, Changwon 👏👏 https://t.co/W0EgX14Eiq pic.twitter.com/JnLvXgFJdV
— SAI Media (@Media_SAI) July 11, 2022
वरिष्ठ संघासह अर्जुनचे हे पहिले सुवर्णपदक ( Arjun first gold medal with senior team ) आहे. अझरबैजानच्या गबाला येथे 2016 च्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत सहभागी होणारा आणखी एक भारतीय पार्थ माखिजा 258.1 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. इस्रायलच्या 33 वर्षीय सर्गेई रिक्टरने 259.9 गुणांसह तिसरे स्थान पटकावले.
हेही वाचा - Sprinter Bhagwani Devi : 94 वर्षीय आजीने अप्रतिम कामगिरी, 3 पदके जिंकत फिनलंडमध्ये फडकवला तिरंगा