ETV Bharat / sports

Shooting World Cup : ऑलिम्पियन अंजुम मौदगिलने नेमबाजीत पटकावले कांस्यपदक - sports news

माजी वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेती आणि ऑलिम्पियन अंजुम मौदगिलने ( Olympian Anjum Moudgil ) ISSF विश्वचषक ( ISSF Shooting World Cup ) स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिले. महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनचा अंतिम सामना रविवारी झाला. यामध्ये टॉप-8 महिला खेळाडूंनी सहभाग घेतला. पिस्तूल, रायफल, शॉटगनचा विश्वचषक कोरियात खेळला जात आहे.

Anjum Moudgil
Anjum Moudgil
author img

By

Published : Jul 18, 2022, 5:37 PM IST

चांगवान: भारताच्या अंजुम मौदगिलने रविवारी ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत ( ISSF Shooting World Cup ) कांस्यपदक जिंकले ( Anjum Moudgil won bronze Medal ). तिने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ही कामगिरी केली. अंजुमने अंतिम फेरीत 402.9 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. तिने नीलिंगमध्ये 100.7, प्रोनमध्ये 101.6 आणि स्टँडिंग पोझिशनमध्ये 200.6 गुण मिळवले. जर्मनीच्या अॅना जेन्सेनने सुवर्ण तर इटलीच्या बार्बरा गाम्बारोने रौप्यपदक जिंकले.

अंजुमने 2018 चांगवॉन वर्ल्ड कपमध्ये ( 2018 Changwon World Cup ) रौप्य पदक जिंकले होते. भारत चार सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह एकूण 11 पदकांसह पदकतालिकेत आघाडीवर आहे. अंजुम नेमबाजी खेळातील सर्वोत्तम खेळाडू आहे. गेल्या वर्षी भारताला ऑलिम्पिक कोटाही देण्यात आला होता.

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय महिला नेमबाजी संघाचा ( Indian Women's Shooting Team ) टॉप 10 खेळाडूंमध्ये समावेश आहे. कोरियात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात अंजुम मौदगिल भारताला सुवर्णपदक मिळवून देऊ शकली नाही, पण कांस्यपदक जिंकल्यानंतरही तिचे कुटुंब खूप आनंदी आहे.

हेही वाचा - Kohli praises pant and pandya : पंत आणि पंड्याच्या शानदार फलंदाजीचे कोहलीकडून कौतुक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.