ETV Bharat / sports

Wourld cup 2022 : भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर पडणार, शोअब अख्तरची भविष्यवाणी.. - भारतीय संघ

झिम्बाब्वेकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाबर आझमचा संघ या आठवड्यात पाकिस्तानात परतेल, तर भारतीय संघ पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियातून रवाना होईल, अशी भविष्यवाणी शोअब अख्तरने (Shoaib Akhtar predicted about Team India ) केली आहे.

Wourld cup 2022
भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर पडणार
author img

By

Published : Oct 29, 2022, 4:44 PM IST

नवी दिल्ली : ICC T20 विश्वचषकात गुरुवारी झालेल्या पाकिस्तान विरूद्ध झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यात पाकिस्तान संघाचा पराभव झाला आहे. या पाकिस्तानला एका धावाने पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानच्या या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू आणि चाहते पाकिस्तान संघावर जोरदार टीका करत आहेत. वसीम अक्रम, शोएब मलिक, वकार युनूस आणि मिस्बाह-उल-हक या माजी खेळाडूंनी पाकिस्तान संघाला तोंड दिले. याशिवाय पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही ( Shoaib Akhtar ) बाबर आझमच्या संघावर घणाघाती हल्ला चढवला आहे.

शोअब अख्तरची भारतीय संघावरची भविष्यवाणी - शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनलवर टीम इंडियाबाबत एक भविष्यवाणी केली आहे. अख्तर म्हटला की, 'मी आधीच सांगितले आहे की पाकिस्तानचा संघ या आठवड्यात मायदेशी परतेल आणि भारत देखील उपांत्य फेरी खेळून पुढील आठवड्यात मायदेशी परतेल. (Shoaib Akhtar predicted about Team India ) तो (भारत) सुद्धा तीस मार खान नाही आणि आपण त्याच्यापेक्षा वाईट आहोत, असा निशाणा त्याने भारतीय संघावर साधला आहे. त्यानंतर नेटकरी रावळपिंडी एक्स्प्रेसवर संतापले.

शोअब अख्तरचा पाकसंघावर संताप - पराभव झाल्यानंतर शोएब अख्तरने पाकिस्तानच्या पराभवासाठी कर्णधार बाबर आझमपासून पीसीबी अध्यक्ष रमीझ राजापर्यंत संपूर्ण टीमला जबाबदार धरले. तो म्हणाला, मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की, या स्तरावर यश मिळवण्यासाठी हा सलामीवीर, मिडल ऑर्डर पुरेसा नाही. यावर मी अजून काय म्हणू शकतो? पाकिस्तान संघावर निशाणा साधत शोएब अख्तर पुढे म्हणाला की, तुम्ही झिम्बाब्वेसारख्या संघाकडून हरलात तर मग तुम्हाला कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळायचे आहे ? पाकिस्तानी संघ व्यवस्थापन आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांमध्ये विचारांची कमी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.