मुंबई - टोकियो पॅरालिम्पिकमधील पदकवीर शुटर मनिष नारवाल, उंच उडीपटू शरद कुमार, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत आणि भालाफेकपटू सुंदर सिंग गुर्जर यांची नावे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021 साठी पाठवण्यात आली आहेत. पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियांने या नावांची शिफारस केली आहे. या चौघांनी पॅराऑलिम्पिकच्या माध्यमातून भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.
पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा दीपा मलिक यांनी सांगितलं की, पुरस्कार जिंकल्यानंतर अॅथलिटचे 2024 पॅरिस पॅरालिम्पिक खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळेल.
दीपा मलिक एएनआयशी बोलताना म्हणाल्या, आपल्या खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली. त्यांचा आपल्याला अभिमान आहे. हा पुरस्कार त्यांना पुढील पॅरालिम्पिक स्पर्धेत अधिक प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देईल. ते या पदासाठी पात्र आहेत कारण त्यांनी देशाचा गौरव वाढवला आहे.
दीपा मलिक यांनी भालाफेकपटू सुमित अंटिल आणि शुटर अवनी लेखरा यांच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी केली आहे. याबाबत त्या म्हणाल्या, सुमित अंटिल आणि अवनी लेखरा यावेळी अर्जुन पुरस्कार जिंकतील, दोघांनी देशाचे नाव उंचावले आहे.
मागील महिन्यात केंद्रिय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंच्या नावाची शिफारस राष्ट्रीय पुरस्कारसाठी करण्यात येईल, असे सांगितलं होते. दरम्यान, टोकियो पॅरालिम्पिकसाठी राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा पुढे ढकलण्यात आली होती.
हेही वाचा - प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि VVS लक्ष्मण यांच्याशी BCCI संपर्क करण्याची शक्यता
हेही वाचा - T20 WC 2021: विराट कोहलीनंतर प्रशिक्षक रवी शास्त्री देखील देणार राजीनामा, दिले संकेत