दोहा - भारतीय नेमबाजपटू सौरभ चौधरीने सध्या सुरू असलेल्या १४ व्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत विक्रमी कामगिरी केली. सौरभने १० मीटर एअर पिस्टल नेमबाजी प्रकारात रौप्य पदक मिळवले.
हेही वाचा - शेफालीचा 'कहर' सुरुच, दुसऱ्या टी-२० सामन्यात विडींजच्या गोलंदाजांना धुतलं
१७ वर्षीय चौधरीने अंतिम फेरीत २२४.५ गुणांची कमाई केली आणि दुसरे स्थान मिळविले. उत्तर कोरियाच्या किम सोंग गुकने विश्वविक्रम नोंदविला आणि लुझील शूटिंग कॉम्प्लेक्स येथे झालेल्या सामन्यात २४६.५ गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले.
आठ खेळाडूंच्या अंतिम सामन्यात भारताच्या अभिषेक वर्माला १८१.५ गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. चौधरी आणि वर्मा यांनी यापूर्वीच आगामी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली आहे. नेमबाजीत भारताला आतापर्यंत १५ ऑलिम्पिक कोटा मिळाले आहेत.