ETV Bharat / sports

World Championships 2022 सात्विक चिराग जोडीने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पटकावले पहिले कांस्यपदक - जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022

जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीला पहिल्या गेममध्ये विजयाचा फायदा घेता आला नाही आणि 77 मिनिटे चाललेल्या या सामन्यात 22-20, 18-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला. सात्विक आणि चिराग Satwik and Chirag जोडीला मलेशियाच्या जोडीकडून सलग सहावा पराभव स्वीकारावा लागला.

Satwik and Chirag
सात्विक चिराग
author img

By

Published : Aug 27, 2022, 4:43 PM IST

टोकियो भारताच्या पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी Satwiksairaj Rankireddy आणि चिराग शेट्टी Chirag Shetty या जोडीला शुक्रवारी उपांत्य फेरीत मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वुई यिक या सहाव्या मानांकित जोडीकडून पराभव पत्करावा लागला. जागतिक बॅडमिंटन 2022 स्पर्धेतील पहिले कांस्यपदक Satwik and Chirag won first bronze medal जिंकून त्यांनी मोहिमेचा शेवट केला.

मलेशियाच्या जोडीकडून सलग सहावा पराभव

जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीला पहिल्या गेममध्ये विजयाचा फायदा घेता आला नाही. तसेच 77 मिनिटे चाललेल्या या सामन्यात 22-20, 18-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला. सात्विक आणि चिराग Sattvik and Chirag यांना मलेशियाच्या जोडीकडून हा सलग सहावा पराभव पत्कारावा लागला. या महिन्याच्या सुरुवातीला कॉमनवेल्थ गेम्सच्या मिश्र सांघिक फायनलमध्येही त्यांना या जोडीकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतरही भारतीय जोडीने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत भारताचे पदक निश्चित केले. 2011 नंतर भारताने या स्पर्धेत नेहमीच पदके जिंकली आहेत.

जागतिक चॅम्पियनशिपमधील दुहेरीत भारताचे दुसरे पदक

जागतिक चॅम्पियनशिपमधील दुहेरीत भारताचे हे दुसरे पदक India second doubles medal World Championships आहे. यापूर्वी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या जोडीने 2011 मध्ये महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकले होते. जागतिक चॅम्पियनशिपमधील भारताचे हे एकूण 13 वे पदक आहे. पीव्ही सिंधूने 2019 मधील सुवर्ण पदकासह या स्पर्धेत एकूण पाच पदके जिंकली आहेत, तर सायना नेहवालने एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले आहे. याशिवाय किदाम्बी श्रीकांतने रौप्य, लक्ष्य सेन, बी साई प्रणीत आणि प्रकाश पदुकोणने कांस्यपदक पटकावले आहे.

हेही वाचा - Women World Cup फिफाने भारतात होणाऱ्या Aiff, U 17 महिला विश्वचषक स्पर्धेवरील बंदी उठवली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.