मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू देशभरातील लोकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. 24 जुलै रोजी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजनी गटात पदक जिंकत भारताचे पदकाचे खाते उघडले. चानू टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली खेळाडू आहे.
आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ आहे एका चिमूकलीचा. ज्यात चिमुकली वेटलिफ्टिंग करताना पाहायला मिळत आहे. तर तिच्या पाठीमागे टीव्हीवर मीराबाई चानूने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेला सामना सुरू असल्याचे दिसत आहे.
-
So cute. Just love this. https://t.co/IGBHIfDrEk
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) July 26, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">So cute. Just love this. https://t.co/IGBHIfDrEk
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) July 26, 2021So cute. Just love this. https://t.co/IGBHIfDrEk
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) July 26, 2021
चिमुकली ही वेटलिफ्टर सतिश यांची मुलगी आहे. ती मीराबाई चानूला पाहून चानूसारखी वेटलिफ्टिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे.
रौप्य पदक विजेती मीराबाई चानूची प्रतिक्रिया -
गोड चिमुकलीने केलेली वेटलिफ्टिंग पाहून रौप्य पदक विजेती मीराबाई चानूने देखील या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने, सो क्यू, जस्ट लव्ह धिस, असे म्हटलं आहे.
हा व्हिडिओ वेटलिफ्टर सतिश शिवालिंगम यांनी शेअर केला आहे. सतिश यांनी वेटलिफ्टिंगमध्ये भारताचे नाव उज्जल केलं आहे. दरम्यान, या व्हिडिओवर तुफान प्रतिक्रिया येत आहेत.
वेटलिफ्टिंमध्ये पदक जिंकणारी मीराबाई चानू दुसरी भारतीय
ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकणारी मीराबाई चानू दुसरी भारतीय ठरली. याआधी 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्नम मल्लेश्वरीने 69 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले होते. या प्रकारात मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकत भारताचा 21 वर्षांचा दुष्काळ संपवला.
हेही वाचा - मीराबाई चानू: लाकडाचा भारा उचलण्यापासून ते ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास
हेही वाचा - हम नहीं सुधरेंगे! पाकच्या ध्वजवाहकांनी Tokyo Olympics मध्ये कोरोना नियम पायदळी तुडवले