ETV Bharat / sports

Sania Mirza Announces Retirement: टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती, 2022 असणार शेवटचा सीजन - सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती

Sania Mirza Announces Retirement: सानिया पुढच्या महिन्यात दुबई ड्युटी फ्री टेनिस चॅम्पियनशिपमध्ये टेनिसमधून निवृत्त होणार आहे. (Dubai Tennis Championships) तिला शेवटच्या मोसमात निवृत्ती घ्यायची होती, (Sania Mirza retire) पण दुखापतीमुळे ती निवृत्त होऊ शकली नाही.

Sania Mirza Announces Retirement
टेनिसपटू सानिया मिर्झा
author img

By

Published : Jan 7, 2023, 11:00 AM IST

नवी दिल्ली : टेनिस स्टार सानिया मिर्झा निवृत्त होणार आहे. (Sania Mirza) दुबई टेनिस चॅम्पियनशिप 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे, (Dubai Tennis Championships) ज्यामध्ये ती शेवटच्या वेळी खेळताना दिसणार आहे. (Sania Mirza Announces Retirement) ३६ वर्षीय सानियाची फिटनेस चांगली नसल्याने तिने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.(Sania Mirza retire) तिचा मुलगा 4 वर्षांचा झाला आहे, (sania mirza tennis) ज्याच्यासोबत तिला वेळ घालवायचा आहे.

सानिया मिर्झाने दुबईत टेनिस अकादमी सुरू केली असून त्यात ती निवृत्तीनंतर नवीन खेळाडूंना तयार करताना दिसणार आहे. 2022 च्या अखेरीस निवृत्त होणार असल्याचे तिने गेल्यावर्षी जाहीर केले होते. मात्र गेल्यावर्षी ती तिच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चर्चेत आली होती. असे मानले जाते की, दुखापतीमुळे ती यूएस ओपन खेळू शकली नाही, ज्यामध्ये तिला घटस्फोटाची घोषणा करावी लागली. अशा स्थितीत सानिया या वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार असून त्यानंतर ती युएईमध्ये चॅम्पियनशिप खेळून टेनिसमधून निवृत्ती घेईल.

गेल्या वर्षी निवृत्तीचा निर्णय: सानियाने एका न्यूज वेबसाईटला सांगितले की, 'मला गेल्या वर्षी डब्ल्यूटीए फायनलनंतरच निवृत्ती घ्यायची होती. पण कोपराच्या दुखापतीमुळे यूएस ओपन आणि उर्वरित स्पर्धेतून माघार घेतल्याने हे होऊ शकले नाही. यामुळेच दुबई टेनिस स्पर्धेनंतर मी निवृत्त होणार आहे.

पाकिस्तानी क्रिकेटर सोबत लग्न: सानिया मिर्झाने 2010 मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले. 30 ऑक्टोबर 2018 रोजी सानियाने एका मुलाला जन्म दिला. 2022 मध्ये सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची बातमी पाकिस्तानी मीडियामध्ये आली होती. दोघांचा अधिकृत घटस्फोट झाल्याचीही चर्चा होती.

सानियाला हे पुरस्कार मिळाले: टेनिस स्टार सानियाने अनेक स्पर्धा जिंकून भारताचे नाव उंचावले आहे. टेनिसमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अर्जुन पुरस्कार (2004), पद्मश्री (2006), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (2015) आणि पद्मभूषण (2016) ने सन्मानित करण्यात आले आहे.

6 प्रमुख चॅम्पियनशिपमध्ये पदके: सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपन (2016), विम्बल्डन (2015) आणि यूएस ओपन (2015) दुहेरीत जिंकली आहे. तिने मिश्र दुहेरीत तीन ग्रँडस्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन (2009), फ्रेंच ओपन (2012) आणि यूएस ओपन (2014) विजेतेपदेही जिंकली आहेत.

सामन्यानंतर सानिया काय म्हणाली? ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये सामना पराभूत झाल्यानंतर सानिया म्हणाली, 'निवृत्ती घेण्याची काही कारणं आहेत. मला वाटतं मला सामन्यासाठी पूर्ण फिट होण्यासाठी मला अधिक वेळ लागत आहे. मी इतका प्रवास करुन माझ्या 3 वर्षाच्या मुलाची प्रकृतीही धोक्यात टाकत आहे. मला वाटतं माझी प्रकृती नीट साथ देत नसून गुडघेही फार दुखतात. त्यामुळेच मला सामन्यासाठी फिट होण्यास जास्त वेळ लागत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.