नवी दिल्ली - पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक, २०२२ बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक व अन्य जागतिक स्पर्धांमध्ये रशियाला आपला ध्वज वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. क्रीडा लवादाच्या न्यायालयाने (सीएएस) दोन वर्षांसाठी ही बंदी घातली आहे.
हेही वाचा - विराट कोहलीकडून तब्बल ५१ वर्षे जुना विक्रम सर!
शिवाय, या दोन वर्षांत रशियाला कोणत्याही स्तरावरील जागतिक स्पर्धांचे आयोजन करण्यास बंदी आहे. रशियाचे खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये तटस्थ ध्वजाखाली भाग घेऊ शकतात. मात्र, त्यांना आपल्या देशाचे नाव किंवा रशियाच्या राष्ट्रीय महासंघांचे प्रतीक वापरण्याची परवानगी नाही. त्यामुळे रशियन अँटी-डोपे एजन्सी (रुसाडा) वर देखील बंदी घातली जाईल.
रशियावरील वाडाच्या आरोपांमुळे तीन न्यायाधीशांचे खंडपीठ मोठ्या प्रमाणात समाधानी असल्याचे दिसून आले, परंतु वाडाच्या चार वर्षांची बंदी बदलून दोन वर्ष का करण्यात आली, हे स्पष्ट होऊ शकले नाही.