सिंधुदुर्ग - धावपटू अथर्व रजनीश राणे याने लडाख मॅरेथॉन जिंकली असून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. लेह येथे दरवर्षी प्रतिष्ठेच्या लडाख आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत यंदा कणकवलीच्या अथर्व सहभागी झाला होता. त्याने २१ किमी अंतर २ तास ५० मिनिटांत पूर्ण करत रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
हेही वाचा - अॅशेस : चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी
अथर्व हा कणकवली तालुक्यातील जानवली गावचा धावपटू आहे. लडाख मॅरेथॉन ही जगातील सर्वात उंचावर होणारी एकमेव मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळखली जाते. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून चौदा हजार फूट उंचीवर आहे. यंदा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जर्मनी, फ्रान्स, यूके, अमेरिका आदी देशातील तब्बल ६ हजारहून अधिक धावपटू सहभागी झाले होते.
हेही वाचा - एकदिवसीय इतिहासात टीम इंडियाने उभारलेली 'टॉप ५' सर्वोच्च धावसंख्या
दरम्यान, अथर्व राणे याने पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. तो परेल मुंबई येथील नारायण मेघाजी लोखंडे श्रम विज्ञान संस्थेचा विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे
हेही वाचा - 'सर, कौनसा माल फुकते हो?', नेटिझन्सकडून शास्त्री गुरुजी ट्रोल