ETV Bharat / sports

पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी साजरा केला जागतिक योग दिवस

नव्या उत्साह व ताकदीनिशी पुणेरी पलटणचे खेळाडू २० जुलै २०१९ पासून सुरू होणाऱ्या विवो प्रो कबड्डी लीगच्या सातव्या एडिशनसाठी सिद्ध होत आहेत.

पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी साजरा केला जागतिक योग दिवस
author img

By

Published : Jun 21, 2019, 7:44 PM IST

पुणे - आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी पुणेरी पलटण टीमच्या खेळाडूंनी पुण्यातल्या दऱ्याडोंगरात नियमित योग सत्रांना सुरूवात केली. योग गुरू श्रद्धा नथानी यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने योगासनांचा सराव सुरू केला आहे. पलटण टीमच्या खेळाडूंना त्यांच्या शारीरिक व मानसिक ताकदीवर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी योगासने हा त्यांच्या नियमित फिटनेस उपक्रमातला महत्वाचा भाग आहे.

पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी साजरा केला जागतिक योग दिवस
पुणेरी पलटणच्या खेळाडूंनी साजरा केला जागतिक योग दिवस

२०१५ साली सुरूवात झाल्यानंतरचा यंदा पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन होता. योग हे भारताच्या श्रीमंत व वैविध्यपूर्ण संस्कृतीचे प्रतिक असून कबड्डी हा खेळदेखील पुरातन भारतीय परंपरेचेच द्योतक आहे. श्वासावर आपले सर्व लक्ष केंद्रित करून जागृत मनाने योगासने करणे आणि शरीर व मनाच्या सर्वांगीण विकासासाठी संतुलन प्रस्थापित करणे हेच योगासनांचे मूळ आहे.

पुणेरी पलटण ही टीम आपण प्रतिनिधीत्व करीत असलेल्या संस्कृतीशी प्रामाणिक राहून आपल्या नियमित व्यायामांमध्ये योगासनांना अनन्यसाधारण महत्व देते.

नव्या उत्साह व ताकदीनिशी पुणेरी पलटणचे खेळाडू विवो प्रो कबड्डी लीगसाठी सिद्ध होत आहेत

श्रद्धा नथानी या जाहिरात व विपणन क्षेत्रात १३ हून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या विपणन व्यावसायिक असून केरळ, न्यूयॉर्क आणि बहामाज् येथे नियमित योग कार्यशाळा घेणाऱ्या त्या नोंदणीकृत योग शिक्षिका आहेत. विवो पीकेएल सिझन ५ पासून त्या पुणेरी पलटण टीमसाठी योग सत्रे आयोजित करत आहेत.

योग दिनानिमित्त बोलताना श्रद्धा नथानी म्हणाल्या, ''पुणेरी पलटण कबड्डी खेळाडूंसाठी योग ही त्यांच्या नैसर्गिक खेळाची गरज असून या खेळासाठी त्यांच्यात तीव्र क्षमता, सहज प्रतिक्रिया आणि जलद विचारशक्तीची गरज असते. इतक्या स्पर्धात्मक पातळीवर खेळण्यासाठी खेळाडूंना त्यांचे मन शांत ठेवावे लागते. ही गोष्ट केवळ योगासनांमुळे शक्य होऊ शकते.''

पुणेरी पलटणचे वरीष्ठ प्रशिक्षक अनूप कुमार म्हणाले, ''योगासनांचे अनेक फायदे असल्यामुळे पुणेरी पलटण टीमच्या नियमित दैनंदिनीत योगसाधनेला वेगळे महत्व आहे. योग हा भारताच्या समृद्ध परंपरेचा एक भाग आहे. आज जगभरातील अनेक संस्कृतीत योगसाधनेचा स्विकार करण्यात आला आहे. टीमच्या फिटनेसमध्ये नियमित योग सत्रे अंतर्भूत असतील, याची मी नेहमी खबरदारी घेतो.''

Intro:Body:

5

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.