हैदराबाद - प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामातील चौथ्या सामन्यात तामिळ थलायवाजने तेलुगू टायटन्सचा 39-26 ने पराभव केला. सामन्यात राहुल चौधरीने चांगला खेळ केला. मात्र, तो आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. या स्पर्धेत तेलुगू टायटन्सचा हा सलग दुसरा पराभव आहे.
पहिल्या हाफमध्ये तामिळ थलायवाजने 20-10 अशी बढत घेतली होती. तामिळ थलायवाजचे चढाईपटू आणि बचावपटूंनी चांगला खेळ केला.
दुसऱ्या हाफमध्ये तामिळ थलायवाजने तेलुगू टायटन्सला जेरीस आणले होते. तामिळ थलायवाजच्या खेळाडूंनी टायटन्सला सामन्यात परतूच दिले नाही. पहिला हाफ राहुल चौधरीने गाजवला तर दुसरा हाफमध्ये मंजीत छिल्लरचा बोलबोला होता. तेलुगू टायटन्सचा पुढील सामना २४ जुलैला दबंग दिल्ली सोबत होणार आहे. तर तामिळ थलायवाजचा सामना २५ जुलैला दबंग दिल्लीसोबत होणार आहे.