अमरावती - 72 व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त अमरावती ग्रामीण पोलिसाच्या वतीने जिल्हाभर 'ग्रीन रन' मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील 2 हजाराहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. ही स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली.
ग्रीन रन स्पर्धेत धावण्याची व सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हात ऑनलाइन व व्हॉट्सअपद्वारे तसेच ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले होते. यात शहरासह जिल्ह्याच्या 14 तालुक्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. तब्बल 2 हजार 305 स्पर्धकांनी यात आपला सहभाग नोंदवला होता.
तिवसा येथेही ही स्पर्धा पार पडली. यात ७ किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत शेकडो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा माझी वसुंधरा, अभियान ग्रीन रन मॅरेथॉन मोहीम अंतर्गत आयोजित करण्यात आली होती. या धाकधुकीच्या जीवनात, सर्वांनी फिट राहावे व शरीर सुदृढ राहावं यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती, असे तिवसाच्या पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदुर रेल्वे, वरूड, मोर्शी, भातकुली, चांदूर बाजार धारणी, चिखलदारा, तिंवसा, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर आदी तालुक्यांमध्ये ही स्पर्धा पार पडली.
हेही वाचा - ग्रामस्तरीय प्रक्रिया उद्योगासह विपणन व्यवस्थेचे बळकटीकरण गरजेचे - बच्चू कडू
हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराने बुजवली 'प्रश्नचिन्ह' आश्रम शाळेची विहीर