मुंबई - पोलंडची महिला भालाफेकपटू मारिया आंद्रेजिक हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या रौप्य पदकाचा लिलाव केला आहे. एका 8 महिन्यांच्या मुलाच्या हृदयाची सर्जरी होती. त्यामुळे मारियाने आपल्या पदकाचा लिलाव केला. मारियाचे पदक पोलंडच्या एका सर्विस स्टोर कंपनीने जवळपास अडीच करोड रुपयाची बोली लावत खरेदी केले आहे.
पोल मिलोसजेक नावाच्या 8 महिन्याच्या, मुलाच्या हृदयावर अमेरिकेमध्ये सर्जरी करण्यात येणार आहे. यासाठी मारियाने 11 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत या मुलासाठी पैसे गोळा करण्याचे आवाहन केले होते. यात तीने आपलं पदक लिलाव करण्याचा निर्णय घेतला.
मारियाच्या पदकावर सर्वाधिक अडीच करोड रूपयाची बोली लागली. पोलंडच्या एका सर्विस स्टोर कंपनीने ही बोली लावली.
डेली मेलच्या वृत्तानुसार, त्या मुलावर स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीमध्ये सर्जरी केली जाणार आहे. त्याच्या परिवाराने 1.5 मिलियन जॉल्टी गोळा केले आहेत. आता मरियाने पदकाचा लिलाव करत आणखी पैसे गोळा केले आहेत.
मारिया आंद्रेजिक हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 64.61 मीटर लांब भाला फेकत रौप्य पदक जिंकले होते. तर ऑस्ट्रेलियाची केल्सी-ली बार्बर कास्य पदकाची विजेती ठरली. तिने 64.56 मीटर लांब भाला फेकला होता.
मारिया 2016 रियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या क्रमाकांवर राहिली. यावर्षी तिने मे महिन्यात वर्ल्ड टॉप 71.40 मीटर लांब भाला फेकत कमाल कामगिरी केली होती.
मारिया होती कॅन्सरग्रस्त -
2018 मध्ये मारियाला हाडाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले. ती यावर एक वर्ष उपचार घेत होती. उपचारानंतर तिने 2019 मध्ये यूरोपियन टीम चॅम्पियनशीप सुपर लीगमध्ये भाग घेतला. यात ती दुसऱ्या स्थानावर राहिली.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 विश्वकरंडक जिंकण्यासाठी सक्षम - रिकी पाँटिग
हेही वाचा - यूपी सरकारचा टोकियो ऑलिम्पिक पदक विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव