मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृती चिन्हाच्या ई लिलावात भाग घेण्याचे आवाहन केले आहे. यातून येणारी रक्कम नमामि गंगा मिशनसाठी देण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्रिय सांस्कृतीक मंत्रालयाकडून नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तू यात शॉल, पगडी आणि जॅकेटसह 2700 हून अधिक स्मृती चिन्हाचा लिलाव केला जात आहे.
ऑफिशियल लिलाव वेबसाईटच्या मते, ब्लॉकवर 1300 हून अधिक वस्तू आहेत. ज्यात पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज अवनी लेखराचा टी शर्ट (बेस प्राइज 15 लाख), टोकियो ऑलिम्पिक खेळाडूंची स्वाक्षरी असलेला स्टोल (बेस प्राइज 90 लाख), तिरंदाज भवानी देवाचे कृपाण याचा समावेश आहे. याशिवाय महिला आणि पुरूष ऑलिम्पिक संघाचे हॉकी स्टिक आणि एक ऑटोग्राफ असलेला रॅकेट देखील आहे. हे रॅकेट पी. व्ही. सिंधूचा आहे. पीएम मोदी यांनी ट्विट करत सांगितलं की, मला मिळालेल्या भेटवस्तू तसेच स्मृती चिन्हाचा लिलाव केला जात आहे. यात आपल्या ऑलिम्पिक खेळाडूद्वारा देण्यात आलेल्या खास स्मृती चिन्हाचा समावेश आहे. या लिलावात जरूर सहभागी व्हा. यातील रक्कम ननामि गंगा मिशनसाठी वापरण्यात येणार आहे.
नीरज चोप्राच्या भाल्यावर लागली 10 कोटी रुपयांची बोली -
टोकियो ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राचा भाला देखील लिलावात ठेवण्यात आला आहे. या भाल्याची बेस प्राइज 1 करोड रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. बातमी लिहीपर्यंत या भाल्यावर 10 करोड रुपयांपर्यंत बोली लावण्यात आली आहे. सुमित अंटिलचा भाल्याची बेस प्राईज 1 करोड इतकी असून त्याच्यावर 3 करोड रुपयांची बोली लागली आहे.
पी. व्ही. सिंधूच्या रॅकेटवर 2 करोडहून अधिक रूपयांची बोली लागली आहे. याची बेस प्राइज 80 लाख इतकी आहे. टोकियो ऑलिम्पिक कास्य पदक विजेती महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिच्या ग्लब्जची बेस प्राइज 80 लाख असून यावर 1 करोड 92 लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे. दरम्यान, सप्टेंबर 2019 मध्ये 2 हजार 770 वस्तूचा लिलाव झाला होता. ज्यात पेंटिग, मूर्ती, शॉल, जॅकेटसह पारंपरिक संगीत साहित्यांचा समावेश होता.
नमानि गंगा मिशनसाठी दिली जाणार रक्कम
ई लिलावातून मिळणारी रक्कम नमामि गंगा मिशनसाठी दिली जाणार आहे. कोणतीही व्यक्ती pmmementos.gov.in या संकेतस्थळावर जाऊन बोली लावू शकते. 7 ऑक्टोबरपर्यंत या वस्तूवर लिलाव लावता येणार आहे. लिलाव प्रक्रिया संपल्यानंतर मंत्रालयाकडून ई मेल द्वारे सर्वोच्च बोली लावणाऱ्या कळवले जाणार आहे.
हेही वाचा - MI Vs CSK : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या दमदार खेळीबद्दल काय म्हणाला ऋतुराज गायकवाड
हेही वाचा - 'बायो बबलचे वाईट परिणाम, मानसिक आरोग्य समस्या टाळण्यासाठी संतुलन आवश्यक'