नवी दिल्ली: ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने ( Javelin thrower Neeraj Chopra ) प्रतिष्ठित डायमंड लीग स्पर्धेचे विजेतेपद जिंकून ( Diamond League tournament Title ) आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली. हे विजेतेपद पटकावणारा चोप्रा पहिला भारतीय खेळाडू आहे. डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा यांचे अभिनंदन केले ( PM Modi congratulates Neeraj Chopra ) आहे.
शुक्रवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट ( Prime Minister Narendra Modi tweet ) केले की, "प्रतिष्ठित डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय बनून पुन्हा एकदा इतिहास रचल्याबद्दल नीरज चोप्रा यांचे अभिनंदन." त्याने उत्तम समर्पण आणि सातत्य दाखवले आहे. त्याचे वारंवार मिळालेले यश हे भारतीय ऍथलेटिक्सची प्रचंड प्रगती दर्शवते.
-
Congratulations to @Neeraj_chopra1 for scripting history yet again by becoming the first Indian to win the prestigious Diamond League Trophy. He has demonstrated great dedication and consistency. His repeated successes show the great strides Indian athletics is making. pic.twitter.com/dlkXU77Xt5
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congratulations to @Neeraj_chopra1 for scripting history yet again by becoming the first Indian to win the prestigious Diamond League Trophy. He has demonstrated great dedication and consistency. His repeated successes show the great strides Indian athletics is making. pic.twitter.com/dlkXU77Xt5
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2022Congratulations to @Neeraj_chopra1 for scripting history yet again by becoming the first Indian to win the prestigious Diamond League Trophy. He has demonstrated great dedication and consistency. His repeated successes show the great strides Indian athletics is making. pic.twitter.com/dlkXU77Xt5
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2022
चोप्राने फाऊलने सुरुवात केली पण दुसऱ्या प्रयत्नात 88.44 मीटर फेकून त्याने अव्वल स्थान गाठले. त्याच्या कारकिर्दीतील ही चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे, ज्याने त्याला सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने पुढील चार प्रयत्नांमध्ये 88.00 मीटर, 86.11 मीटर, 87.00 मीटर आणि 83.60 मीटर फेकले. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता झेक प्रजासत्ताकच्या जेकोब वडलागेने ( Olympic silver medalist Jakob Wadlage ) 86.94 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह दुसरे स्थान पटकावले.
नीरज नंतर ( Neeraj Chopra Statement ) म्हणाला, आज वडलागेसोबतची स्पर्धा खूप चांगली झाली. त्याने चांगले थ्रोही केले. मी आज 90 मीटर भालाफेक करेन अशी अपेक्षा होती, पण मला आनंद आहे की आता माझ्याकडे डायमंड लीग ट्रॉफी आहे आणि हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हे देखील महत्त्वाचे आहे, कारण माझ्यासोबत माझे कुटुंब इथे आहे. तो म्हणाला, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ते माझ्यासोबत आले आहेत. कारण ही माझी शेवटची स्पर्धा आहे आणि त्यानंतर आम्ही पॅरिसला सुट्टीवर जाऊ.
हेही वाचा - Virat Kohli Hundred : विराट कोहलीने 1020 दिवसांनंतर झळकावले शतक, पाहा कशी राहिली आहे विराटची कारकिर्द