टोकियो - टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱ्या खेळाडूंमध्ये जर कोविड-१९ ची लक्षणे दिसली तर त्यांना एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन केलं जाणार आहे. या संदर्भातील वृत्त जपानच्या एका वृत्तसंस्थेने दिलं आहे. दरम्यान, ऑलिम्पिकची सुरूवात २३ जुलैपासून होणार आहे.
जपानच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ऑलिम्पिकसाठी एक नवे हॉटेल उभारण्यात येत आहे. यात ३०० हून अधिक खोल्या असणार आहेत. हे हॉटेल शहरापासून काही ठिकाणच्या अंतरावर उभारण्यात येत आहे.
या हॉटेलमधील खोल्या त्या खेळाडूंसाठी असणार आहेत. ज्यांना रुग्णालयात भर्ती करण्याची आवश्यकता नसेल. दरम्यान, जपानकडून येत असलेल्या या तयारीवरून लक्षात येत की, यंदाचे ऑलिम्पिक मोठ्या खबरदारी घेऊन भरवले जात आहे.
हेही वाचा - नेत्रा कुमानन बनली ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय नौकायनपटू
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिकसाठी नेमबाजी संघात कोल्हापुरातील चौघांचा समावेश