ETV Bharat / sports

भारतीय पॅरालिम्पिक समिती मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार - PCI will try to get recognition news

मान्यता मिळवल्यानंतर, टोकियो ऑलिम्पिकची तयारी सुरू करण्यावर पीसीआयचा भर होता. मात्र, कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली.

PCI will try again to get recognition
भारतीय पॅरालिम्पिक समिती मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार
author img

By

Published : Apr 27, 2020, 4:40 PM IST

नवी दिल्ली - भारतीय पॅरालिम्पिक समिती (पीसीआय) मान्यता मिळवण्याच्या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाची बैठक घेण्याची योजना आखत आहे. ही बैठक या आठवड्यात होण्याची चिन्हे आहेत.

मान्यता मिळवल्यानंतर, टोकियो ऑलिम्पिकची तयारी सुरू करण्यावर पीसीआयचा भर होता. मात्र, कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली. पीसीआय अध्यक्ष दीपा मलिक यांनी सांगितले, की येत्या आठवड्यात आम्ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाशी बोलण्याचा विचार करत आहोत. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेण्यापूर्वी कागदी कामांची औपचारिकता पूर्ण करण्याच्याही आम्ही प्रयत्नात आहोत.

त्या पुढे म्हणाल्या, “फक्त सर्व कागदपत्रे पूर्ण होण्याची वाट पाहत होतो. पण आमच्याकडे कोर्टाचा आदेश आहे आणि बर्‍याच गोष्टींची सोडवणूक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने निवडणुका मान्य केल्या आहेत आणि नवीन समितीलाही मान्यता मिळाली आहे. आशा आहे की ही कागदपत्रे पुरेशी होतील.”

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.