टोक्यो - रौप्य पदकावर आपले नाव कोरत टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले आहे. भाविनाला महिला एकेरीत चीनच्या झाऊ यिंगकडून ३-० असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. याच दिवशी भाविनाने इतिहास रचत रौप्य पदक जिंकल्याचे पॅरालिम्पिक मंडळाच्या अध्यक्ष दीपा मलिक यांनी म्हटले आहे.
-
VICTORY CEREMONY!! 🇮🇳🥈@BhavinaPatel6 takes to the podium for India's first Medal of #Tokyo2020 @Paralympics!! ❤️💙💚#Praise4Para @Bhavina59068010 https://t.co/Gjmo4Y5sbT
— Paralympic India 🇮🇳 #Cheer4India 🏅 #Praise4Para (@ParalympicIndia) August 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">VICTORY CEREMONY!! 🇮🇳🥈@BhavinaPatel6 takes to the podium for India's first Medal of #Tokyo2020 @Paralympics!! ❤️💙💚#Praise4Para @Bhavina59068010 https://t.co/Gjmo4Y5sbT
— Paralympic India 🇮🇳 #Cheer4India 🏅 #Praise4Para (@ParalympicIndia) August 29, 2021VICTORY CEREMONY!! 🇮🇳🥈@BhavinaPatel6 takes to the podium for India's first Medal of #Tokyo2020 @Paralympics!! ❤️💙💚#Praise4Para @Bhavina59068010 https://t.co/Gjmo4Y5sbT
— Paralympic India 🇮🇳 #Cheer4India 🏅 #Praise4Para (@ParalympicIndia) August 29, 2021
'विशेष आनंद'
मला याहून अधिक आनंद काय असेल, की एका महिला खेळाडूने पदकाचे खाते उघडले. अशी खेळाडू जी व्हीलचेअरचा वापर करत असेल, असेही दीपा मलिक म्हणाल्या. सुवर्णपदक जिंकण्याची संधी भाविनाला होती, मात्र जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या यिंगने तिचा पराभव केला.
'भव्य स्वागत करू'
रौप्य पदक जिंकल्यानंतर तिचे वडील हसमुखभाई पटेल म्हणाले, की तिने आमचा गौरव वाढवला आहे. ती परतल्यानंतर भव्य स्वागत करू. या विजयानंतर गुजरातच्या मेहसाणामध्ये तिच्या कुटुंबासह नागरिकांनी जल्लोष केला.
यिंगचा प्रभाव
पहिल्या सेटमध्ये यिंगने भाविनाला ११-७ने पराभूत केले. तर दुसऱ्या सेटमध्ये ११-५ तर तिसऱ्या सेटमध्ये ११-६ अशा फरकाने भाविनाला पराभूत करत यिंगने सुवर्णपदक प्राप्त केले.
आतापर्यंतची पदके
पॅरालिम्पिकमध्ये तीन क्रीडाप्रकारात भारताने आतापर्यंत १२ पदके प्राप्त केली आहेत. यात अॅथलेटिक्स (३ सुवर्ण, ४ रौप्य तर ३ कांस्य, पॉवरलिफ्टिंग (१ कांस्य) आणि स्विमिंग (१ सुवर्ण) यांचा समावेश आहे. मात्र टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे.