नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा खेळाडू पंकज अडवाणीने आयबीएसएफ विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. म्यानमारच्या मंडाले येथे झालेल्या या स्पर्धेत त्याने अंतिम सामन्यात नेय थ्वाय ओलाला ६-२ ने हरवत कारकिर्दीतील २२ वे विश्व विजेतेपद नावावर केले.
-
2019 World Billiards Champion (150 up) 🏆❤️😀💪🏼🥇 What. An. Incredible. Feeling. pic.twitter.com/MPQLSzsfnb
— Pankaj Advani (@PankajAdvani247) September 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">2019 World Billiards Champion (150 up) 🏆❤️😀💪🏼🥇 What. An. Incredible. Feeling. pic.twitter.com/MPQLSzsfnb
— Pankaj Advani (@PankajAdvani247) September 15, 20192019 World Billiards Champion (150 up) 🏆❤️😀💪🏼🥇 What. An. Incredible. Feeling. pic.twitter.com/MPQLSzsfnb
— Pankaj Advani (@PankajAdvani247) September 15, 2019
हेही वाचा - टेनिस : कॅरोलिना प्लिस्कोवाने पटकावले झेंगझू ओपनचे जेतेपद
बिलियर्ड्सच्या शॉर्ट फॉरमॅट प्रकारात पंकजचे हे सलग चौथे जेतेपद आहे. मागच्या वर्षी अंतिम सामन्यातही पंकजने नेय थ्वाय ओलाला पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले होते. २०१४ नंतर झालेल्या प्रत्येक स्पर्धेत पंकजने बिलियर्ड्स, स्नुकरमध्ये विजेतेपद पटकावले आहे. २००३ मध्ये पहिले जगज्जेतेपद पटकावल्यानंतर पंकजची विजयी घोडदौड सुरूच आहे. या खेळात सर्वाधिक जगज्जेतेपद पटकावणारा तो जगातील एकमेव स्नूकरपटू ठरला आहे.
विजेतेपद जिंकल्यानंतर पंकज म्हणाला, 'खरंच हे अविश्वसनीय आहे. लागोपाठ चार वर्ष जेतेपद पटकावणे आणि मागच्या सहापैकी पाचवेळा जेतेपद जिंकणे हे माझ्यासाठी खास आहे. मी जेव्हा विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेतो तेव्हा एक गोष्ट असते की माझ्याकडे प्रेरणा खूप असते. त्यामुळे माझ्यातील जिंकण्याची भूक आणि आग अजूनही कायम आहे. '
पंतप्रधान मोदींनीही केले पंकजचे कौतुक -
पंकजच्या या विजेतपदावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे', असे मोदींनी म्हटले आहे.
-
Thank you so much for your wishes Hon PM Sir 🙏🏻 It means a lot. https://t.co/EVUoIqAYNM
— Pankaj Advani (@PankajAdvani247) September 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank you so much for your wishes Hon PM Sir 🙏🏻 It means a lot. https://t.co/EVUoIqAYNM
— Pankaj Advani (@PankajAdvani247) September 15, 2019Thank you so much for your wishes Hon PM Sir 🙏🏻 It means a lot. https://t.co/EVUoIqAYNM
— Pankaj Advani (@PankajAdvani247) September 15, 2019