ETV Bharat / sports

भारताचा बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये टॉप श्रेणीच्या ग्रुप बी मध्ये समावेश - चीन

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला 8 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. कोरोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा ऑनलाईन खेळली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा दुसऱ्या सत्रामध्ये टॉप डिव्हिजनच्या बी गटात समावेश करण्यात आला आहे.

Online chess Olympiad: India placed in Pool B of Top Division
भारताचा बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये टॉप श्रेणीच्या ग्रुप बी मध्ये समावेश
author img

By

Published : Sep 6, 2021, 7:15 PM IST

Updated : Sep 9, 2021, 3:00 PM IST

चेन्नई - भारताला आठ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत दुसऱ्या सत्रामध्ये, टॉप डिव्हिजनच्या बी गटात ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, भारत मागील वर्षी या स्पर्धेचा संयुक्त विजेता ठरला होता.

ग्रुप बी मध्ये भारत, फ्रान्स, बेलारूस, आणि अजरबैजान यांच्यासह इतर संघाचा समावेश आहे. इतरमध्ये शेनझेन चीन, मोल्दावा, स्लोवेनिया, मिस्त्र, स्वीडन आणि हंगेरी या संघाचा समावेश आहे. चार ग्रुपमधून प्रत्येकी दोन संघ प्ले ऑफ फेरीसाठी पात्र ठरतील.

शेनजेन चीन, मोल्दोवा, स्लोवेनिया आणि स्वीडन हे दुसऱ्या डिव्हिडजन (ग्रुप ए) मधून टॉप डिव्हिजनसाठी पात्र ठरले आहेत. एकूण 15 संघांनी दुसऱ्या डिव्हिजनमधून टॉप डिव्हिजनमध्ये पात्रता मिळवली आहे. टॉप डिव्हिडजनमध्ये रूस, अमेरिका, चीन, भारतसह 25 संघाचा समावेश आहे.

भारतीय संघ मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या ऑनलाईन ऑलिम्पियाड स्पर्धत रूस सोबत संयुक्तपणे विजेता ठरला होता.

यंदाच्या वर्षी ऑनलाईन ऑलिम्पियाडसाठी भारतीय संघात माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद, विदीत संतोष गुजराती, पी हरिकृष्णा, निहाल सरीन, आर. प्रागनानंदा, कोनेरू हम्पी, डी हरिका, तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी, आर. वैशाली आणि बी सविता यांचा समावेश आहे.

हेही वाचा - IND vs ENG: हसीब हमीद आणि रोरी बर्न्‍सची अर्धशतके, इंग्लंडच्या उपहारापर्यंत 2 बाद 131 धावा

हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेआधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, मिसबाह उल हकसह वकार युनूसचा राजीनामा

Last Updated : Sep 9, 2021, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.