नवी दिल्ली - चीनचा ऑलिम्पिक विजेता जलतरणपटू सुन यांगवर ८ वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. क्रीडा लवादाने (सीएएस) डोपिंगप्रकरणी ही कारवाई केली आहे.
हेही वाचा - VIDEO : न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने घेतलेला जबरदस्त झेल पाहिलात का?
या निर्णयानंतर यांगला टोकियो ऑलिम्पिकमध्ये २०० मीटर फ्री स्टाईलचे विजेतेपद राखता येणार नाही. इतकेच नव्हे तर या निर्णयामुळए यांगची कारकीर्दही संपेल असे मानले जात आहे. स्विमिंगची नियामक संस्था फिनाने यांगवरील डोपिंगचे आरोप फेटाळून लावले होते. त्याविरूद्ध वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सीने (वाडा) अपील केले होते.
२८ वर्षीय यांगने २०१२ मधील लंडन ऑलिम्पिकमध्ये दोन आणि २०१६ च्या रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये एक सुवर्ण जिंकले आहे.