ETV Bharat / sports

छत्रसाल स्टेडिअममध्ये झालेल्या खूनाप्रकरणी कुस्तीपटू सुशील कुमार दिल्ली पोलिसांच्या रडावर - छत्रसाल स्टेडिअम खून बातमी

दिल्लीतील मॉडल टाउनमध्ये असलेल्या छत्रसाल स्टेडिअममध्ये दोन कुस्तीपटूंच्या दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादामध्ये सागर नावाच्या नवोदित कुस्तीपटूचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलीस ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारचा शोध घेत आहेत.

Chhatrasal Stadium murder news
छत्रसाल स्टेडिअम खून बातमी
author img

By

Published : May 6, 2021, 2:06 PM IST

नवी दिल्ली - छत्रसाल स्टेडिअममध्ये झालेल्या एका खूनाप्रकरणी दिल्ली पोलीस ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारचा शोध घेत आहेत. पोलिसांनी बुधवारी सुशीलकुमारच्या घरी छापा टाकला होता मात्र, तो त्याठिकाणी नव्हता. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशीलकुमार आणि त्याच्या मित्रांनी मिळून खून केल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रिन्स दलाल नावाच्या व्यक्तीला अटक केली असून घटनास्थळावरून एक डबल बॅरल गन देखील जप्त केली आहे.

मंगळवारी रात्री उशिरा मॉडल टाउनमध्ये असलेल्या छत्रसाल स्टेडिअममध्ये दोन कुस्तीपटूंच्या दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादामध्ये सागर, सोनू महाल आणि अमित कुमार हे तिघे गंभीर जखमी झाले होते. यातील सागरचा उपचारांदरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. मॉडल टाउनमध्ये सुशीलकुमारचा एक फ्लॅट आहे. तो त्याने सागरला राहण्यासाठी दिला होता. काही दिवसांपूर्वी त्याने सागरला घर खाली करण्यास सांगितले होते. यावरूनच दोघांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

सुशीलची भूमिका संशयास्पद -

मारहाण झालेल्या गटातील तरुणांच्या म्हणण्यानुसार सुशील कुमार आणि त्याच्या मित्रांनी सागरला जबर मारहाण करून त्याचा खून केला. त्यामुळे पोलीस सध्या सुशील कुमारचा शोध घेत आहेत. सुशील कुमारची चौकशी झाल्यानंतरच सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. सुशील कुमार जर प्राथमिक चौकशीमध्ये दोषी आढळला तर त्याला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

ज्युनिअर नॅशनल चॅम्पियन होता सागर -

छत्रसाल स्टेडिअममध्ये झालेल्या मारहाणीत मृत्यू झालेला 23 वर्षीय सागर हरियाणातील सोनीपतचा आहे. त्याचे वडील दिल्ली पोलिसात हवालदार आहेत. तो कुस्तीमध्ये ज्युनिअर नॅशनल चॅम्पियन होता. छत्रसाल स्टेडिअममध्ये तो नियमित सराव करत होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.