भुवनेश्वर - भारताची महिला धावपटू द्युती चंद हिच्या ऑलिम्पिक तयारीसाठीच्या कार विक्री करावी लागल्याच्या वृत्तावर ओडिशा सरकारने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 2015पासून द्युतीला 4.09 कोटी देण्यात आले असल्याचे ओडिशा सरकारने स्पष्ट केले. द्युतीने अलीकडेच फेसबुकवर तिच्या बीएमडब्ल्यू कार विक्रीची पोस्ट केली होती. मात्र, आक्षेपार्ह प्रतिक्रिया आल्यानंतर तिने ही पोस्ट काढून टाकली.
ओडिशा सरकारच्या क्रीडा विभागाने म्हटले, "द्युतीला एशियन गेम्स 2018मध्ये पदक जिंकण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन म्हणून 3 कोटी रुपये, 2015-19 मध्ये प्रशिक्षण आणि आर्थिक मदतीसाठी 30 लाख रुपये आणि टोकियो ऑलिम्पिक प्रशिक्षणासाठी 50 लाख रुपये देण्यात आले आहेत. राज्य सरकारने द्युती चंदला ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशनमध्ये गट-अ दर्जाची अधिकारी (ए गोल्ड कॅटेगरी पीएसयू) म्हणून नियुक्त केले. सध्या ती दरमहा, 84,604 रुपये वेतन घेत आहे. तिला कार्यालयात येण्याची गरज नाही, जेणेकरून ती पूर्णपणे प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकेल."
ओडिशा सरकारने म्हटले आहे, "त्यानुसार ओएमसीपदी तिची नियुक्ती झाल्यापासून तिला कोणतेही अधिकृत काम सोपवण्यात आलेले नाही. प्रशिक्षण आणि आर्थिक प्रोत्साहन यासाठी ओएमसीने 29 लाख रुपयांची तरतूद केली आहे."
यासंदर्भात, द्युतीने बुधवारी ट्विट केले. ''मी माझी कार विकण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. लक्झरी कार सांभाळण्यासाठी माझ्याकडे संसाधन नाही. तरीही मला कारची खूप आवड आहे. माझ्या प्रशिक्षणासाठी ही कार विक्री करत असल्याचे मी कधीच म्हटले नाही.''
-
Statement. pic.twitter.com/AHEP3q50Ds
— Dutee Chand (@DuteeChand) July 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Statement. pic.twitter.com/AHEP3q50Ds
— Dutee Chand (@DuteeChand) July 15, 2020Statement. pic.twitter.com/AHEP3q50Ds
— Dutee Chand (@DuteeChand) July 15, 2020
ती म्हणाली, "ओडिशा सरकारने आणि माझ्या स्वत: च्या केआयआयटी विद्यापीठाने मला नेहमीच पाठिंबा दर्शवला आहे. माझे प्रशिक्षण खूपच महाग आहे, विशेषकरून 2021च्या ऑलिम्पिकसाठी मला नाकारता येणार नाही. मला फक्त माझ्या प्रशिक्षणासाठी हा पैसा हवा होता. राज्य सरकारकडून पैसे मिळाल्यानंतर आणि कोरोनानंतर कार खरेदी करता येईल."