ETV Bharat / sports

Neeraj Chopra : नीरज चोप्राने मोडला स्वत:चा राष्ट्रीय विक्रम; पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर थ्रोसह पटकावले रौप्यपदक - नीरज चोप्राने मोडला स्वतचा राष्ट्रीय विक्रम

नीरज चोप्राने फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर फेकून स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला ( Neeraj Chopra broke own national record ). मागील वर्षी मार्चमध्ये नीरजने पटियाला येथे 88.07 मीटर फेकण्याचा त्याचा मागील सर्वोत्तम विक्रम होता.

Neeraj Chopra
Neeraj Chopra
author img

By

Published : Jun 15, 2022, 4:38 PM IST

नवी दिल्ली: भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने फिनलंडमधील पावो नूरमी गेम्समध्ये 89.30 मीटर भाला फेकून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित ( Neeraj Chopra new record in Finland ) केला. मात्र, 89.30 मीटरची सर्वोत्तम फेक करूनही नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने 88.07 मीटरचा आपला मागील राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला, जो त्याने गेल्या वर्षी मार्चमध्ये पटियाला येथे प्रस्थापित केला होता.

7 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58m च्या ऐतिहासिक सुवर्णपदक-विजेत्या थ्रोनंतर चोप्राची ऑलिम्पिक खेळानंतरची ही पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. पावो नुर्मी गेम्समध्ये त्याचा राष्ट्रीय विक्रम मोडूनही तो स्पर्धेतील आपल्या आवडत्या ऑलिव्हर हेलँडरच्या ( Javelin thrower Oliver Helander ) मागे राहिला. त्यामुळे नीरजला दुसरा क्रमांक मिळाला. ऑलिव्हर हेलँडरने 89.93 मी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. दरम्यान, ग्रेनेडाच्या जगज्जेत्या अँडरसन पीटर्सने 86.60 मीटर भाला फेकून तिसरे स्थान पटकावले.

टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राचे विक्रम

चोप्राची दहा महिन्यांनंतरची पहिली स्पर्धात्मक स्पर्धा ऐतिहासिक क्षण ठरली. कारण ऍथलीटने प्रतिष्ठित 90 मीटरचा टप्पा जवळपास गाठला आहे. जे भालाफेकच्या जगात सुवर्ण मानक मानले ( 90m stage gold standard javelin throw ) जाते. याआधी नीरज चोप्रा तुर्कीमध्ये सराव करताना म्हणाला होता, “मी अंतराचे दडपण घेत नाही. पीटर्स आणि जेकब खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. माझेही 90 मीटरचे अंतर पार करण्याचे स्वप्न असून यावर्षी प्रयत्न करेन.

हेही वाचा - Ruturaj Gaikwad Statement : आयुष्य ट्रॅकवर नाही, आयपीएलच्या कामगिरीने अपेक्षा वाढल्या रुतुराज गायकवाड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.