ETV Bharat / sports

'राजीव गांधींचे नाव हटवताच गोल्ड आले', नीरज चोप्रावरील एका ट्विटने पेटला नवा वाद - ashoke pandit

नीरज चोप्राने ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर बॉलिवूड चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटवरुन वाद सुरू झाला आहे. खेलरत्न पुरस्कारवरून राजीव गांधींचे नाव काढताच सुवर्ण पदक आलं आहे, असे अशोक पंडित यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अशोक पंडीत यांच्या या ट्विटवर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

neeraj-chopra-wins-gold-medal-ashoke-pandit-says-gold-came-as-soon-as-rajiv-gandhi-name-removed-gets-troll
'राजीव गांधींचे नाव हटवताच गोल्ड आले', नीरज चोप्रावरील एका ट्विटने पेटला नवा वाद
author img

By

Published : Aug 8, 2021, 1:12 PM IST

मुंबई - भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. या ऑलिम्पिकमध्ये त्याने 87.58 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. नीरजच्या या कामगिरीनंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे एका ट्विटवरुन सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे.

नीरज चोप्राने ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकल्यानंतर बॉलिवूड चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटवरुन वाद सुरू झाला आहे. खेलरत्न पुरस्कारवरून राजीव गांधींचे नाव काढताच सुवर्ण पदक आलं आहे, असे अशोक पंडित यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अशोक पंडित यांच्या या ट्विटवर लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

neeraj-chopra-wins-gold-medal-ashoke-pandit-says-gold-came-as-soon-as-rajiv-gandhi-name-removed-gets-troll
अशोक पंडित यांनी केलेले ट्विट

दरम्यान, काही तासांपूर्वीच भारत सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले. त्यांनी या पुरुस्काराचे नवे नाव, मेजर ध्यानचंद असे केलं आहे. या विषयावरून वादविवाद सुरू आहे. अशात अशोक पंडित यांनी वादग्रस्त ट्विट करत आणखी एका वादाला तोंड फोडलं आहे.

टोकियोत नीरज चोप्राची भरारी

भालाफेकच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रा सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. त्याने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर अंतर कापले होते. दुसऱ्यांदा त्याने 87.58 चे अंतर कापले होते. त्यानंतर अन्य भालाफेकटपटूंना त्याच्याहून अधिक लांब भाला फेकता आला नाही आणि नीरज सुवर्ण पदक विजेता ठरला. भालाफेकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक आहे. एवढेच नव्हे तर हे भारताचे मैदानी खेळ प्रकारातीलही (अॅथलेटिक्स) पहिले सुवर्णपदक आहे.

हेही वाचा - Ind vs Eng : जेम्स अँडरसनने सिराजला डिवचलं, खेळाडूनं दिलं जशास तसं उत्तर

हेही वाचा - BAN vs AUS: ऑस्ट्रेलियन फलंदाजाने शाकिब उल हसनला धुतलं; एकाच षटकात खेचले 5 षटकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.